सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग

सना खानची हत्या ज्या ठिकाणी झाली तेथील रक्तांचे नमुने घेतले असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तेथे आणखी दोन जणांच्या रक्ताचे डाग असल्याची बाबदेखील समोर आली आहे. अशा स्थितीत आता हे नवे डाग कुणाचे आहे

सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग

सना खानची हत्या ज्या ठिकाणी झाली तेथील रक्तांचे नमुने घेतले असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तेथे आणखी दोन जणांच्या रक्ताचे डाग असल्याची बाबदेखील समोर आली आहे. अशा स्थितीत आता हे नवे डाग कुणाचे आहे या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.नागपूर  भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक नवीन वळण आले आहे.

 

सना खानची २ ऑगस्ट २०२३ रोजी जबलपूर येथे आरोपी अमित साहू याने त्याच्या घरी हत्या केली होती. त्यानंतर त्याने सनाचा मृतदेह हिरन नदीत फेकून दिला होता. पोलिसांनी मोठी शोधमोहीम राबवूनदेखील मृतदेह सापडला नव्हता. पोलिसांनी या प्रकरणात साहूसह इतर आरोपींना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात फॉरेन्सिक तपासणी केली व डीएनए चाचणीदेखील करण्यात आली.

Edited By –  Ratnadeep ranshoor

 

Go to Source