रस्त्यांवर झगमगाट; स्मशानात अंधारवाट
अंधारामुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात करण्यात आला अंत्यविधी
बेळगाव : स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या बेळगाव शहरातील अनेक स्मशानभूमी मात्र अंधारात आहेत. रविवारी रात्री सदाशिवनगर येथील लिंगायत समाजाच्या कलमठ स्मशानभूमीत मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी 21 फेब्रुवारी रोजी रात्री दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेले संदीप मल्लिकार्जुन उदोशी (वय 43) रा. महांतेशनगर यांचे उपचाराचा उपयोग न होता रविवार दि. 3 मार्च रोजी दुपारी खासगी इस्पितळात निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानभूमीत अंधार असल्यामुळे नातेवाईक व कुटुंबीयांना मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शेवटचे विधी करावे लागले. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून अंत्यविधीसाठी स्मशानात पोहोचायला उशीर झाला. रात्री कलमठ स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य होते. स्मशानाच्या एका कोपऱ्यात एकच दिवा सुरू होता. जिथे दफनविधी करायचा आहे, त्या परिसरात मात्र पूर्णपणे अंधार होता. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना मोबाईल टॉर्च सुरू कराव्या लागल्या. शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेळगावात मुख्य रस्त्यांवर झगमगाट करण्यात आला आहे. स्मशानभूमींच्या विकासासाठीही वेळोवेळी निधीचा वापर केला जातो. मात्र, कलमठ स्मशानभूमीत प्राथमिक सुविधाच उपलब्ध नाहीत. अंधारामुळे समोरचे खाचखळगे दिसत नाहीत. त्यामुळे अंत्यक्रियेसाठी स्मशानात येणाऱ्यांनाही घाबरतच यावे लागते. केंद्रीयमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी लिंगायत स्मशानभूमीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. तरीही स्मशानात अंधारात चाचपडावे लागत आहे. या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी दिला आहे.
Home महत्वाची बातमी रस्त्यांवर झगमगाट; स्मशानात अंधारवाट
रस्त्यांवर झगमगाट; स्मशानात अंधारवाट
अंधारामुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात करण्यात आला अंत्यविधी बेळगाव : स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या बेळगाव शहरातील अनेक स्मशानभूमी मात्र अंधारात आहेत. रविवारी रात्री सदाशिवनगर येथील लिंगायत समाजाच्या कलमठ स्मशानभूमीत मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी 21 फेब्रुवारी रोजी रात्री दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेले […]