वचना देसाईला ब्लॅकबेल्ट

बेळगाव : कुमार गंधर्व कलामंदिर एस, पी, ऑफिस रोड बेळगाव येथे कराटेची ब्लॅक बेल्ट परीक्षा पार पडली. या परिक्षत वचना देसाई हिला ब्लॅकबेल्ट देऊन गौरव करण्यात आले.बेळगाव जिह्याचे मुख्य परीक्षक गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आले. वचना बसवराज देसाई ही गेल्या 12  वर्षापासून छत्रपती शिवाजी नगर येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करित होती. […]

वचना देसाईला ब्लॅकबेल्ट

बेळगाव : कुमार गंधर्व कलामंदिर एस, पी, ऑफिस रोड बेळगाव येथे कराटेची ब्लॅक बेल्ट परीक्षा पार पडली. या परिक्षत वचना देसाई हिला ब्लॅकबेल्ट देऊन गौरव करण्यात आले.बेळगाव जिह्याचे मुख्य परीक्षक गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आले. वचना बसवराज देसाई ही गेल्या 12  वर्षापासून छत्रपती शिवाजी नगर येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करित होती. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली. इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष . गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते वचना देसाईला ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.  यावेळी पालक सुनिता बसवराज देसाई, रमेश देसाई व गीता देसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करण्यात आला. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता  काकतीकर  व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, हरीष सोनार, दीपिका भोजगार , विनायक दंडकर,  परशराम नेकनार, रतिक लाड, कृष्णा देवगाडी , सौरभ मजुकर, श्रेया यळ्ळूरकर , अनुज कोळी, आदित्यराज यादव, कृष्णा जाधव, संजीव गस्ती आणि संतोष तेलंग यांनी विशेष परिश्रम घेतले.