आचारसंहितेपूर्वी भाजपची पहिली यादी?

2019 चा विक्रम मोडण्यासाठी बनवला ‘गेम प्लॅन’ : 50 टक्के मतांचे लक्ष्य निर्धारित वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक जागा लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजप जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, […]

आचारसंहितेपूर्वी भाजपची पहिली यादी?

2019 चा विक्रम मोडण्यासाठी बनवला ‘गेम प्लॅन’ : 50 टक्के मतांचे लक्ष्य निर्धारित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक जागा लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजप जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांची नावे असू शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 टक्क्मयांहून अधिक मते मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने पहिल्याच यादीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्या जागांची नावे जाहीर केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 436 जागा लढवून 303 जागा जिंकल्या आणि 133 जागांवर निवडणूक हरली. या निकालानंतर भाजपने दुसऱ्या स्थानी असलेल्या आणि कमकुवत असलेल्या 164 मतदारसंघात भक्कम पायाभरणी केली. यासाठी पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी गेल्या पाच वर्षात प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याशिवाय ‘क’ आणि ‘ड’ अशा श्रेणीमध्येही काही मतदारसंघ टाकून त्यांची जबाबदारी 45 मंत्र्यांकडे देण्यात आली होती.
पहिल्या यादीत बिहारच्या नवादा, सुपौल, किशनगंज, कटिहार, मुंगेर, गया, सुपौल या जागांसाठी उमेदवार घोषित केले जातील. तसेच केरळमध्ये त्रिशूर, थटनामिट्टा आणि तिऊवनंतपुरम या जागा आहेत. भाजप सुरेश गोपी यांना त्रिशूरमधून तिकीट देऊ शकते. महाराष्ट्रात बारामती, बुलढाणा आणि औरंगाबाद, पंजाबमध्ये अमृतसर, आनंदपूर साहिब, भटिंडा आणि गुऊदासपूरचा समावेश आहे. युतीतील चर्चेमुळे पंजाब, महाराष्ट्र आणि बिहारमधील काही जागाही बदलू शकतात. यावेळी 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि तीनपेक्षा जास्त वेळा विजयी झालेल्या लोकसभेच्या खासदारांना तिकीट न देण्याचा भाजपचा डाव आहे. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
मित्रपक्षांशी बोलणी
2019 मध्ये भाजपचा पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, बिहारमध्ये जेडीयू, महाराष्ट्रात शिवसेना, तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि राजस्थानमध्ये हनुमान बैनीवाल यांचा पक्ष आरएलपी यांच्याशी समन्वय होता. भाजपने पंजाबमध्ये 13 पैकी 3 जागा, महाराष्ट्रात 48 पैकी 25 आणि बिहारमध्ये 40 पैकी 17 जागा लढवल्या होत्या. तर तामिळनाडूमध्ये द्रमुकने भाजपला पाच जागा दिल्या होत्या. मात्र, भाजपने या राज्यांमध्ये अधिक जागांवर निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने आतापासूनच बोलणी सुरू केल्याचे समजते.