अकाली दलात फूट पाडण्याचा भाजपचा कट : हरसिमरत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलात सुरू असलेल्या अंतर्गत कलहावरून भटिंडा येथील खासदार हरसिमरत कौर यांनी दावा केला आहे. शिरोमणी अकाली दल एकजूट असून सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत पाच वगळता सर्व 122 नेते असल्याचे हरसिमरत यांनी म्हटले आहे. भाजपचे काही नेते शिरोमणी अकाली दलात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे ते पंजाबमध्ये राजकीय पक्ष […]

अकाली दलात फूट पाडण्याचा भाजपचा कट : हरसिमरत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलात सुरू असलेल्या अंतर्गत कलहावरून भटिंडा येथील खासदार हरसिमरत कौर यांनी दावा केला आहे. शिरोमणी अकाली दल एकजूट असून सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत पाच वगळता सर्व 122 नेते असल्याचे हरसिमरत यांनी म्हटले आहे.
भाजपचे काही नेते शिरोमणी अकाली दलात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे ते पंजाबमध्ये राजकीय पक्ष फोडू पाहत आहेत. परंतु अकाली दलाचे सर्व नेते एकजूट आहेत. 117 पैकी केवळ 7 नेते सुखबीर सिंह बादल यांच्या विरोधात गेले आहेत असे हरसिमरत कौर यांनी म्हटले आहे.
शिरोमणी अकाली दल एक प्रादेशिक पक्ष असल्याने आम्हाला संसदेत बोलण्यासाठी अधिक वेळ मिळावा. एका प्रादेशिक पक्षाच्या एकमेव खासदार असल्याने पंजाब तसेच पंजाबींचा आवाज उपस्थित करण्यासाठी संसदेत मी उभी राहणार असल्याचे हरसिमरत यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बदल यांच्याविरोधात पक्षात सूर उमटू लागले आहेत. पक्षातील असंतुष्ट गटाने जालंधर येथे वेगळी बैठक घेत बंडाचे संकेत दिले आहेत. या गटाचे नेतृत्व करणारे प्रेमसिंह चंदूमाजरा यांनी पक्षाच्या पराभवासाठी सुखबीर बादल असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर अन्य नेत्यांनीही सुखबीर विरोधात भूमिका मांडली आहे.