चिकलदिन्नी येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करा : मंत्री जारकीहोळी यांचे आवाहन
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विकासाभिमुख योजना आणि पक्षाच्या तत्वांना पसंती देऊन चिकलदिन्नी येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. चिकोडी येथील निवासस्थानी यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील चिकलदिन्नी गावातील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते. काँग्रेस पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला या योजनांची मदत मिळाली आहे. त्यामुळेच अनेक कार्यकर्ते भाजपला सोडचिट्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करण्यासाठी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारकडून अनेक विकासकामे राबविली जात आहेत. जनहिताच्या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. सरकारने दिलेले वचन पाळले आहे. जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून यामुळे पक्षावर विश्वास वाढला आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सहभागी होत असल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह चिकलदिन्नी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी चिकलदिन्नी येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चिकलदिन्नी येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करा : मंत्री जारकीहोळी यांचे आवाहन बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विकासाभिमुख योजना आणि पक्षाच्या तत्वांना पसंती देऊन चिकलदिन्नी येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. चिकोडी येथील निवासस्थानी यमकनमर्डी विधानसभा […]