भाजपला केरळमध्ये ‘शून्य’ जागा मिळणार : खासदार शशी थरूर
वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम
भाजपला केरळमध्ये डबल डिजिटमध्ये जागा मिळतील, परंतु हा आकडा प्रत्यक्षात दोन झिरो असतील. भाजपला केरळचा इतिहास आणि संस्कृती माहित नाही. राज्यात सांप्रदायिकतेला कदापिही थारा मिळणार नसल्याचा दावा काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केला आहे. 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी हे तिरुअनंतपुरमच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 2019 मध्ये केरळच्या लोकांमध्ये निर्माण झालेली आशा आता 2024 मध्ये विश्वासात रुपांतरित झाल्याचे म्हटले होते. तसेच 2019 मध्ये केरळमध्ये भाजपची मतांची हिस्सेदारी दुहेरी आकड्यात होती. परंतु केरळने 2024 मध्ये भाजपला दुहेरी अंकात जागा देण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा मोदींनी केला होता. केरळमध्ये 6 टक्क्यांच्या पक्षाला मोदींनी 12-13 टक्क्यांपर्यंत आणले आहे. परंतु याहून अधिक काहीच साध्य होणार नाही. भाजप आता ख्रिश्चन समुदायाला स्वत:कडे वळवू पाहत असल्याचे आम्हाला माहित आहे. केरळच्या मध्य त्रावणकोर भागात ख्रिश्चन समुदायाचे लक्षणीय प्रमाण आहे. ख्रिश्चन मते निर्णायक असल्याचे मानले जाते, परंतु मणिपूर हिंसेनंतर भाजपची रणनीति अपयशी ठरली आहे. काँग्रेसने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. तसेच मी निवडणूक लढवतोय असेही कुणाला सांगितले नाही. मी केवळ खासदार म्हणून स्वत:च्या कर्तव्याचे पालन करत असल्याचे थरूर म्हणाले.
Home महत्वाची बातमी भाजपला केरळमध्ये ‘शून्य’ जागा मिळणार : खासदार शशी थरूर
भाजपला केरळमध्ये ‘शून्य’ जागा मिळणार : खासदार शशी थरूर
वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम भाजपला केरळमध्ये डबल डिजिटमध्ये जागा मिळतील, परंतु हा आकडा प्रत्यक्षात दोन झिरो असतील. भाजपला केरळचा इतिहास आणि संस्कृती माहित नाही. राज्यात सांप्रदायिकतेला कदापिही थारा मिळणार नसल्याचा दावा काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केला आहे. 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी हे तिरुअनंतपुरमच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 2019 मध्ये केरळच्या लोकांमध्ये निर्माण झालेली आशा आता […]