भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
Dhanraj Aswani Facebook
पिंपरी चिंचवडचे भाजपचे ज्येष्ठनेते धनराज आसवानी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी माजी उपमहापौर डब्बू आसवानी हे देखील उपस्थित होते.
ALSO READ: शिवसेनेच्या नगरसेवकाच्या पतीच्या हत्येप्रकरणी रायगडमध्ये नऊ जणांना अटक
धनराज आसवानी हे भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष होते व त्यांची पत्नी सविता धनराज आसवानी 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर 3000 हुन अधिक मतांच्या फरकाने वार्ड क्रमांक 19 मधून निवडून आल्या होत्या.
ALSO READ: महापालिका निवडणुकीत काँग्रेसने शरद पवार गट आणि वंचित यांच्यासोबत युती केली
धनराज आसवानी हे सध्या पिंपरी मर्चंट फेडरेशनचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. धनराज आसवानी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पिंपरी मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णलयाचे नूतनीकरण, हायस्कुलचे नूतनीकरण उद्यानाचे व स्मशान भूमीचे नूतनीकरण केले.
ALSO READ: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 100 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली, 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार
त्यांनी रोडवर राहणाऱ्या नागरिकांना ब्लॅंकेट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना दिलासा दिला आहे. धनराज आसवानी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 19 मधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.
Edited By – Priya Dixit
