इंधन दरवाढविरोधात भाजपची निदर्शने

छत्रपती संभाजी चौकात साखळी आंदोलन : राज्यभर आंदोलनाचा इशारा बेळगाव : राज्य सरकारकडून इंधन दरवाढ केल्याचा निषेध करत भाजपकडून छत्रपती संभाजी चौकात साखळी करून आंदोलन केले. राज्य सरकारने वाढविलेले इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला. राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलचे दर वाढविल्याने याचा सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. इंधन दरवाढीचा परिणाम इतर सर्व गोष्टींवर […]

इंधन दरवाढविरोधात भाजपची निदर्शने

छत्रपती संभाजी चौकात साखळी आंदोलन : राज्यभर आंदोलनाचा इशारा
बेळगाव : राज्य सरकारकडून इंधन दरवाढ केल्याचा निषेध करत भाजपकडून छत्रपती संभाजी चौकात साखळी करून आंदोलन केले. राज्य सरकारने वाढविलेले इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला. राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलचे दर वाढविल्याने याचा सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. इंधन दरवाढीचा परिणाम इतर सर्व गोष्टींवर होतो. प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. यामुळे याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहे. राज्य सरकारने याची त्वरित दखल घेऊन भाववाढ मागे घ्यावी अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देऊन काँग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला. राज्य सरकार राज्यातील आर्थिक परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. सरकार आर्थिकरित्या कमकुवत झाले आहे. त्यामुळे सरकारवर आर्थिक भार पडत असून याचा भार सर्वसामान्यांवर टाकला जात आहे.
राज्य सरकारकडून इतर राज्यातील पेट्रोल व डिझेल दराची भाव दाखविली जात आहे. मात्र सरकारने इतर राज्यातील परिस्थितीचा दाखला देण्याऐवजी राज्यातील जनतेचे हीत पाहावे, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले. राज्य सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे. वाल्मिकी निगममध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मंत्री नागेंद्र यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येणार आहेत. सरकार केवळ आपल्या राजकीय हितासाठी व खुर्ची टिकविण्याच्या प्रयत्नात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सरकारवरील पकड ढिली झाली आहे. राज्य दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. लवकरच परिवहन मंडळाकडूनही बसदर वाढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागणार आहे. सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खासदार जगदीश शेट्टर, माजी आमदार अनिल बेनके, डॉ. रवी पाटील, मुरुगेंद्र गौडा व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.