उत्तर प्रदेशात भाजपला केवळ 1 जागा
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला 80 पैकी केवळ 1 जागा मिळणार आहे, असे भाकित काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. रविवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गांधी यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेसिंग यादव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी हे विधान केले.
विरोधी पक्ष देशाची घटना वाचविण्यासाठी लढत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटनेवर हल्ला करीत आहेत. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, कोणतीही शक्ती घटनेला दूर करु शकणार नाही. भारतीय जनता पक्ष लोकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. त्यांना घटनाही संपवायची आहे. तथापि, विरोधी पक्षांची आघाडी त्यांना तसे करु देणार नाही, असे वक्तव्य अखिलेश यादव यांनीही राहुल गांधी यांच्या आधी या पत्रकार परिषदेत केले.
चुरशीची लढत
प्रयागराज (अलाहाबाद) मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार नीरज त्रिपाठी यांनाच पक्षाने पुन्हा उमदेवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उज्ज्वल रमण सिंग आहेत. यावेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची युती असून बहुजन समाज पक्ष स्वतंत्ररित्या मैदानात आहे. प्रयागराज येथील निवडणूक चुरशीची होईल, असे अनुमान राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
Home महत्वाची बातमी उत्तर प्रदेशात भाजपला केवळ 1 जागा
उत्तर प्रदेशात भाजपला केवळ 1 जागा
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला 80 पैकी केवळ 1 जागा मिळणार आहे, असे भाकित काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. रविवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गांधी यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेसिंग यादव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी हे विधान केले. विरोधी पक्ष देशाची घटना वाचविण्यासाठी लढत आहे. भारतीय जनता पक्ष आणि […]