भाजप सदस्य नोंदणी मोहीम सुरू
राज्यभरात 25 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून मुंबईसह (mumbai) राज्यभरात (maharashtra) विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान (membership drive) राबविण्यात आले. यासाठी मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. रिक्षा, टॅक्सीचालक, बूट पॉलिश करणारे, फेरीवाले, हमाल या सर्वांनाच या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे सदस्य केले जात असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, पवनकुमार त्रिपाठी, आमदार पराग अळवणी यांच्यासह अनेक बडे नेते अनेक कार्यक्रमात सामील झाले होते. तसेच पश्चिम उपनगरातही भाजपचे (bjp) केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी सदस्य अभियान नोंदणीत सहभाग नोंदविला. पक्षाकडून डिसेंबरपासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 50 हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लागलीच संघटन पर्वाची सुरुवात झाली.हेही वाचाविद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणारकोकणातील ‘या’ तीन रेल्वे गाड्या ठाणे, दादरपर्यंतच धावणार
Home महत्वाची बातमी भाजप सदस्य नोंदणी मोहीम सुरू
भाजप सदस्य नोंदणी मोहीम सुरू
राज्यभरात 25 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून मुंबईसह (mumbai) राज्यभरात (maharashtra) विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान (membership drive) राबविण्यात आले.
यासाठी मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. रिक्षा, टॅक्सीचालक, बूट पॉलिश करणारे, फेरीवाले, हमाल या सर्वांनाच या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे सदस्य केले जात असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, पवनकुमार त्रिपाठी, आमदार पराग अळवणी यांच्यासह अनेक बडे नेते अनेक कार्यक्रमात सामील झाले होते.
तसेच पश्चिम उपनगरातही भाजपचे (bjp) केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी सदस्य अभियान नोंदणीत सहभाग नोंदविला.
पक्षाकडून डिसेंबरपासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 50 हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लागलीच संघटन पर्वाची सुरुवात झाली.हेही वाचा
विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार
कोकणातील ‘या’ तीन रेल्वे गाड्या ठाणे, दादरपर्यंतच धावणार