ओडिशात पहिल्यांदाच भाजपचे सरकार

मोहन माझी मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध : दोन उपमुख्यमंत्र्यांसह 13 मंत्र्यांनीही घेतली शपथ वृत्तसंस्था/ भुवनेश्वर ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 52 वषीय मोहन चरण माझी यांनी बुधवारी राज्याचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंगदेव (67) आणि प्रभावती परिदा (57) यांनीही शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ […]

ओडिशात पहिल्यांदाच भाजपचे सरकार

मोहन माझी मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध : दोन उपमुख्यमंत्र्यांसह 13 मंत्र्यांनीही घेतली शपथ
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 52 वषीय मोहन चरण माझी यांनी बुधवारी राज्याचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंगदेव (67) आणि प्रभावती परिदा (57) यांनीही शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जे. पी. न•ा, अमित शाह, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आसाम, हरियाणा, गोवा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
माझी यांच्या मंत्रिमंडळात आणखी 13 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये सुरेश पुजारी, रबीनारायण नाईक, नित्यानंद गोंड, कृष्णचंद्र पत्रा, पृथ्वीराज हरिचंदन, मुकेश महालिंग, बिभूती भूषण जेना, कृष्ण चंद्र महापात्रा, गणेश रामसिंग खुंटिया, सूर्यवंशी सूरज, प्रदीप बलसामंता, गोकुळा नंद मल्लिक आणि संपद कुमार स्वेन यांचा समावेश आहे.
24 वर्षांनंतर आदिवासी मुख्यमंत्री
24 वर्षांनंतर ओडिशाला आदिवासी मुख्यमंत्री मिळाला. यापूर्वी काँग्रेसचे हेमानंद बिस्वाल हे राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते. बिस्वाल 1989-1990 आणि 1999-2000 असे दोनवेळा मुख्यमंत्री होते. राज्याचे दुसरे आदिवासी मुख्यमंत्री गिरीधर गमंग होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ खूपच कमी होता. बिस्वाल यांच्यानंतर येथे काँग्रेस कधीच सत्तेत नव्हती.
ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच बहुमताने विजय मिळवला आहे. राज्यातील 147 जागांपैकी भाजपला 78 जागा मिळाल्या आहेत. तर नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने (बीजेडी) 51, काँग्रेसने 14, सीपीआय(एम) 1 आणि इतरांना 3 जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही प्रथमच भाजपने येथे मोठा विजय मिळवला आहे.