आसनसोलचे भाजप उमेदवार पवनसिंह यांची माघार
वैयक्तिक कारण’ असल्याचे सोशल मीडियावर स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ कोलकाता
भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार पवनसिंह यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पॉवर स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवन सिंग यांनी सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट शेअर करत निवडणूक न लढवण्यामागे ‘वैयक्तिक कारण’ असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अचानक पवनसिंह यांनी आसनसोलमधून निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
भाजपने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये पवनसिंह यांच्या नावाचाही समावेश होता. पवन सिंग यांच्याशिवाय भोजपुरी इंडस्ट्रीतील दिनेशलाल यादव, रवी किशन आणि मनोज तिवारी यांचीही नावे भाजपच्या यादीत आहेत. ही यादी आल्यानंतर पवनसिंह यांनी भाजप नेतृत्वाचे आभारही मानले. पण, एका दिवसानंतर रविवारी पवनसिंह यांनी सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत आपण काही कारणास्तव आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नसल्याचे स्पष्ट केले.
पवनसिंह यांनी निवडणूक लढविण्यास नकार देण्यामागील कारणांबद्दल बोलताना राजकीय जाणकारांचे वेगवेगळे म्हणणे आहे. त्यांना आरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. आरामधून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी विशेष तयारीही केली आहे. पण, आसनसोलचे तिकीट मिळाल्यावर कदाचित ते समाधानी नसतील. पवनसिंह यांनी अन्य पर्याय निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आरा जागेसाठी पवनसिंह अन्य पक्षाच्या संपर्कात असून पवनसिंह काही मोठा निर्णय घेणार का, असा प्रश्नही लोकांना पडला आहे. तथापि, आसनसोलचे माजी खासदार आणि टीएमसी नेते आणि गायक बाबुल सुप्रियो यांनी भोजपुरी कलाकार पवनसिंह यांनी निवडणूक न लढवण्याचे दुसरे कारण सांगितले. पवनसिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर काही वेळातच बाबुल सुप्रियो यांनी सोशल साईट ‘एक्स’वर एक पोस्टदेखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘भाजपच्या दबावानंतर पवनसिंह यांनी ‘वैयक्तिक कारणास्तव’ आपले नाव मागे घेतले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवाराचे नाव त्याच्या संमतीशिवाय किंवा उमेदवाराशी सविस्तर चर्चा केल्याशिवाय ठेवणे अशक्मय आहे. आज सकाळीही भाजप त्यांच्या उमेदवारीचा बचाव करत होता,’ असे त्यांनी लिहिले आहे.
Home महत्वाची बातमी आसनसोलचे भाजप उमेदवार पवनसिंह यांची माघार
आसनसोलचे भाजप उमेदवार पवनसिंह यांची माघार
वैयक्तिक कारण’ असल्याचे सोशल मीडियावर स्पष्टीकरण वृत्तसंस्था/ कोलकाता भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार पवनसिंह यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पॉवर स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवन सिंग यांनी सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट शेअर करत निवडणूक न लढवण्यामागे ‘वैयक्तिक कारण’ असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अचानक पवनसिंह यांनी आसनसोलमधून निवडणूक न लढवण्याची […]