बहुजन समाज, कार्यकर्त्यांचा रोष लपवण्यासाठी भाजपचा चर्चवर ठपका

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा दावा : आमोणकर, पै यांच्या विरोधात तक्रार मडगाव : दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत बहुजनसमाज व कार्यकर्त्यांनी भाजपला नाकारल्याचे वास्तव लपवण्यासाठी भाजपचे नेते या पराभवासाठी ‘चर्च’ आणि धर्मगुरुंना जबाबदार धरत असल्याचा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकार यांनी केला आहे. मुरगावचे भाजपचे आमदार संकल्प आमोणकर आणि प्रवत्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा […]

बहुजन समाज, कार्यकर्त्यांचा रोष लपवण्यासाठी भाजपचा चर्चवर ठपका

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा दावा : आमोणकर, पै यांच्या विरोधात तक्रार
मडगाव : दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत बहुजनसमाज व कार्यकर्त्यांनी भाजपला नाकारल्याचे वास्तव लपवण्यासाठी भाजपचे नेते या पराभवासाठी ‘चर्च’ आणि धर्मगुरुंना जबाबदार धरत असल्याचा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकार यांनी केला आहे. मुरगावचे भाजपचे आमदार संकल्प आमोणकर आणि प्रवत्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा दावा करून चोडणकर यांनी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करुन त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.आमदार संकल्प आमोणकर आणि गिरीराज पै वेर्णेकर यांनी कॅथोलिक धर्मगुरूंविऊद्ध भडकविल्यामुळे मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. भाजपचे नेते धर्मगुऊंना आणि चर्चला कसे दोष देऊ शकतात, जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या उमेदवाराला स्वीकारलेले नाही आणि बहुजन समाज त्यांच्यापासून दूर गेला आहे. ते या वास्तवापासून जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चर्चवर वारंवार शाब्दिक हल्ले करत आहेत, असे चोडणकर यांनी म्हटले आहे. अशा प्रकारची धार्मिक वक्तव्ये स्वीकारली जाणार नाहीत असे स्पष्ट संकेत देण्यासाठी वरील दोन्ही नेत्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  अशा घटनांमुळे धार्मिक तेढ निर्माण होते. भाजपने लोकसभा निवडणुकीचा निकाल मान्य करावा. त्यांचा काही छुपा अजेंडा असावा आणि त्यामुळे वारंवार चर्चला लक्ष्य केले जात असावे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह इतर आमदार आणि नेते गोव्यातील एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.