राज्यसभेसाठी भाजपकडून 14 उमेदवारांची घोषणा
सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले 14 उमेदवार रविवारी जाहीर केले. बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांसाठी हे उमेदवार घोषित केले आहेत. उत्तर प्रदेशमधून पुन्हा एकदा सुधांशू त्रिवेदी यांना संधी देण्यात आली आहे. तसेच आरपीएन सिंह यांनाही उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली. कर्नाटकातून नारायण कृष्णसा भांडगे, छत्तीसगडमधून राजा देवेंद्र प्रताप सिंह आणि पश्चिम बंगालमधून सामिक भट्टाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हरियाणा भाजपचे माजी प्रमुख सुभाष बराला यांना हरियाणातून पक्षाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांना उत्तराखंडमधून राज्यसभेचे उमेदवार केले आहे. पक्षाने बिहार भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा धर्मशीला गुप्ता यांनाही उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर नितीशकुमार यांचे माजी सहकारी भीम सिंह यांनाही बिहारमधून उमेदवारी दिली आहे. तर चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत आणि नवीन जैन यांनाही उत्तर प्रदेशमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे 32 खासदार निवृत्त होणार
निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत. यंदा भाजपच्या 32 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. तसेच काँग्रेसचे 11 खासदार निवृत्त होणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे 4 आणि बीआरएसच्या 3 खासदारांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. याशिवाय जेडीयू, बीजेडी आणि आरजेडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त होत आहेत. एनसीपी, सपा, शिवसेना, टीडीपी, वायएसआरसीपी, एसडीएफ, सीपीआय, सीपीआयएम आणि केरळ काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार यावषी आपला कार्यकाळ पूर्ण करतील.
Home महत्वाची बातमी राज्यसभेसाठी भाजपकडून 14 उमेदवारांची घोषणा
राज्यसभेसाठी भाजपकडून 14 उमेदवारांची घोषणा
सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले 14 उमेदवार रविवारी जाहीर केले. बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांसाठी हे उमेदवार घोषित केले आहेत. उत्तर प्रदेशमधून पुन्हा एकदा सुधांशू त्रिवेदी यांना संधी देण्यात आली आहे. तसेच आरपीएन सिंह […]
