मिनी टेम्पोच्या धडकेत दुचाकीचालक ठार

ओपा खांडेपार येथील जंक्शनजवळील घटना   फोंडा : ओपा खांडेपार जंक्शनजवळ पार्सलवाहू मिनी टेम्पोने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. सुरेश नाईक (55, मूळ वरचावाडा फेंडा,रा. कोपरवाडा कुर्टी) असे मयताचे नाव आहे. अपघाताची घटना काल मंगळवारी उशिरा रात्री घडली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  सुरेश आपल्या अॅक्टिवा जीए 05 के 0715 ने खांडेपारहून फेंड्याच्या दिशेने येत असताना समोरून […]

मिनी टेम्पोच्या धडकेत दुचाकीचालक ठार

ओपा खांडेपार येथील जंक्शनजवळील घटना  
फोंडा : ओपा खांडेपार जंक्शनजवळ पार्सलवाहू मिनी टेम्पोने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. सुरेश नाईक (55, मूळ वरचावाडा फेंडा,रा. कोपरवाडा कुर्टी) असे मयताचे नाव आहे. अपघाताची घटना काल मंगळवारी उशिरा रात्री घडली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  सुरेश आपल्या अॅक्टिवा जीए 05 के 0715 ने खांडेपारहून फेंड्याच्या दिशेने येत असताना समोरून विरूद्ध दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या बोलेरो मिनी टेम्पो आरजे 49 जीए 5435 ने जोरदार धडक दिली. या धडकेत सुरेश रस्त्यावर फेकला गेला. अत्यवस्थ अवस्थेत त्याला पिळये धारबांदोडा येथील सरकारी इस्पितळात दाखल केले असता उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार आनंद गावकर यांनी पंचनामा केला असून उपनिरीक्षक नितेश काणकोणकर अधिक तपास करीत आहेत. मयत सुरेश हा एक उत्तम टँकरचालक म्हणून फोंडा परिसरात परिचित होता. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.