बिहारची पहिल्या डावात घसरगुंडी
वृत्तसंस्था/ पाटणा
2024 च्या रणजी हंगामातील येथे सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर बिहारची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. मुंबईने पहिल्या डावात 251 धावा जमविल्यानंतर बिहारने पहिल्या डावात दिवस अखेर 6 बाद 89 धावा जमविल्या होत्या. खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशीचा बराच खेळ वाया गेला.
या सामन्यात मुंबईने 9 बाद 235 या धावसंख्येवरुन शनिवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 76.2 षटकात 251 धावात आटोपला. मुंबईच्या डावात लालवाणीने 11 चौकारांसह 65, सुवेद पारकरने 6 चौकारांसह 50, शिवम दुबेने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 41 तर कोटीयानने 7 चौकारांसह 50 धावा केल्या. बिहारतर्फे वीरप्रतापसिंगने 45 धावात 5 तर गनी आणि हिमांषू सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
बिहारच्या डावाला पहिल्या षटकापासूनच गळती लागली. मोहित अवस्तीच्या भेदक माऱ्यासमोर बिहारचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. बिहारतर्फे आकाशराज 3 चौकारांसह 26 धावांवर खेळत असून गनीने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. सूर्यवंशीने 4 चौकारांसह 19 धावा केल्या. अवस्तीने 22 धावात 4 तर शिवम दुबेने 13 धावात 2 गडी बाद केले. दुसऱ्या दिवशीच्या खेळात केवळ 46.2 षटकांचा खेळ झाला. मात्र मुंबईने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव 76.2 षटकात सर्व बाद 251 (लालवाणी 65, पारकर 50, दुबे 41, कोटीयान 50, वीरप्रतापसिंग 5-45, गनी, हिमांषू सिंग प्रत्येकी 2 बळी), बिहार प. डाव 37 षटकात 6 बाद 89 (आकाशराज खेळत आहे 26, गनी 22, सूर्यवंशी 19, मोहित अवस्ती 4-22, शिवम दुबे 2-13).
Home महत्वाची बातमी बिहारची पहिल्या डावात घसरगुंडी
बिहारची पहिल्या डावात घसरगुंडी
वृत्तसंस्था/ पाटणा 2024 च्या रणजी हंगामातील येथे सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर बिहारची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. मुंबईने पहिल्या डावात 251 धावा जमविल्यानंतर बिहारने पहिल्या डावात दिवस अखेर 6 बाद 89 धावा जमविल्या होत्या. खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशीचा बराच खेळ वाया गेला. या सामन्यात मुंबईने 9 बाद […]
