‘बिग बॉस मराठी ६’ची धमाकेदार घोषणा झाली आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी ६’चा एक खास टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये चाहत्यांना एक विशेष थीम दाखवण्यात आली आहे.
ALSO READ: Actor Dharmendra passes away क्रिकेट जगतही धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे
तसेच ‘बिग बॉस मराठी 6’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस हा मराठी मधील सर्वात मोठा रियलिटी शो असून बिग बॉस मराठी लवकरच भेटीला येत आहे. बिग बॉसच्या नवीन सीझनच्या घोषणेमुळे आता उत्साह पाहण्यास मिळतो आहे. कलर्स मराठीने घोषणा केली की, बिग बॉसच्या घराचे दरवाजे पुन्हा उघडणार आहे. कलर्सने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे की, बिग बॉस मराठी नवीन सीझन लवकरच सुरु होत आहे. तसेच या सीझनमध्ये कोण स्पर्धक आहे हे जाणून घेण्याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करणार का? की दुसरे कोणी करणार यावरही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ALSO READ: धर्मेंद्र यांना केवळ पद्मभूषणच नाही तर हे पुरस्कार देखील मिळाले, अनेक विक्रमही केले
Edited By- Dhanashri Naik
