बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

‘बिग बॉस मराठी ३’ फेम आणि ‘स्प्लिट्सविला १३’ चा विजेता जय दुधाणे याने आपल्या दीर्घकाळाच्या गर्लफ्रेंड हर्षला पाटील सोबत २४ डिसेंबर २०२५ रोजी ठाण्यात पारंपरिक मराठी पद्धतीने लग्न केलं.

लग्नात जयने पिवळा कुर्ता-धोतर आणि पागोटे घातलं होतं, तर हर्षलाने नऊवारी साडी नेसली होती. लग्नाला बिग बॉस मधील मित्र, अभिनेत्री सुरेखा कुडची, प्रविण तरडे असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. आधी २२-२३ डिसेंबरला साखरपुडा आणि इतर विधी पार पडले, आणि आता लग्नाचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चाहत्यांकडून जोडप्याला खूप शुभेच्छा मिळत आहे. 

ALSO READ: Flashback : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या अभिनेत्रींनी भारतीय कथांना एक नवीन परिमाण दिला

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: रश्मिका मंदाना अभिनीत ‘मायसा’ या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित, २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार