मुंबईचा केरळवर मोठा विजय

वृत्तसंस्था/ थुंबा 2024 च्या रणजी हंगामातील येथे सुरू असलेल्या ब गटातील सामन्यात मुल्लानी आणि कोटीयान यांच्या शानदार फिरकीच्या जोरावर मुंबई संघाने केरळचा 232 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात सोमवारी केरळचा दुसरा डाव 94 धावांत आटोपला. केरळच्या दुसऱ्या डावात मुल्लानीने 44 धावात 5 गडी तर कोटीयानने 6 धावात 2 गडी बाद केले. मुंबईतर्फे आता रणजी […]

मुंबईचा केरळवर मोठा विजय

वृत्तसंस्था/ थुंबा
2024 च्या रणजी हंगामातील येथे सुरू असलेल्या ब गटातील सामन्यात मुल्लानी आणि कोटीयान यांच्या शानदार फिरकीच्या जोरावर मुंबई संघाने केरळचा 232 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात सोमवारी केरळचा दुसरा डाव 94 धावांत आटोपला.
केरळच्या दुसऱ्या डावात मुल्लानीने 44 धावात 5 गडी तर कोटीयानने 6 धावात 2 गडी बाद केले. मुंबईतर्फे आता रणजी स्पर्धेत मुल्लानी 17 बळींसह आघाडीवर आहे. धवल कुलकर्णीने 32 धावात 2 बळी मिळविले. केरळला मुंबईकडून विजयासाठी 327 धावांचे आव्हान मिळाले होते. केरळने बिनबाद 24 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि 27 षटकात त्यांचे सर्व गडी 94 धावात तंबूत परतले. उपहाराला तासभराचा कालावधीत असतानाच सामना संपुष्टात आला. रणजी स्पर्धेतील मुंबईचा हा तिसरा विजय असून त्यांनी ब गटात 20 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. या सामन्यात 7 गडी बाद करणाऱ्या मोहित अवस्थीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
आंध्रचा विजय
दिब्रुगड येथे खेळविण्यात आलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात आंध्रप्रदेशने यजमान आसामचा 172 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात आंध्रने 6 गुण मिळविले. आता या स्पर्धेत आंध्रच्या संघाने 3 सामन्यातून 9 गुण घेतले आहेत. या सामन्यात आंध्रने आसामला विजयासाठी 363 धावांचे आव्हान दिले होते. पण आसामचा दुसरा डाव 48.2 षटकात 190 धावांत आटोपला. कर्णधार रियान परागने 75 तर सुमित घाडीगावकरने 60 धावा जमविल्या. आंध्रतर्फे ललित मोहनने 4 तर गिरीनाथ रे•ाr आणि मनिष यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. या सामन्यात रिकी भुईला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
जम्मू काश्मिरचा पहिला विजय
कटक येथे सोमवारी झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात जम्मू काश्मिर संघाने ओडीशाचा 2 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील जम्मू काश्मिरचा हा पहिला विजय आहे. या सामन्यात ओडिशा संघाने पहिल्या डावात 130 धावा जमविल्यानंतर जम्मू काश्मिरने पहिल्या डावात 180 धावा जमवित 50 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर ओडिशाचा दुसरा डाव 198 धावात आटोपला. जम्मू काश्मिरला सामन्यातील शेवटच्या दिवशी विजयासाठी 77 धावांची गरज होती. जम्मू काश्मिरने 4 बाद 72 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांनी 23.2 षटकात 8 बाद 149 धावा जमवित हा सामना 2 गड्यांनी जिंकला. अब्दुल समादने नाबाद 66 धावा जमविल्या. ओडिशाच्या राजेश मोहांतीने 61 धावात 5 गडी बाद केले. ड गटात आता जम्मू काश्मिर, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांनी समान गुण नोंदविले आहेत.