12च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, या तारखेपासून हॉल तिकीट मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावीच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट वितरणाबाबतची माहिती समोर आली आहे.
12 वी ची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असून विद्यार्थी वर्ग परीक्षेच्या तयारीला लागले आहे. परीक्षेसाठी मिळणाऱ्या हॉल तिकीट उद्या सोमवार 12 जानेवारी 2026 पासून उपलब्ध होणार आहे.
ALSO READ: अबू आझमी यांचे नितेश राणेंवरील वादग्रस्त विधान, म्हणाले- मशिदीत प्रवेश करून दाखवा
ही घोषणा राज्यभरातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू असून या बाबतच्या सूचना शाळा व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारीपासून महाविद्यालयांच्या अधिकृत लॉगिनवर विद्यार्थ्यांची हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात असून त्यानंतर संबंधित महाविद्यालये ही हॉलतिकीट विद्यार्थ्यांना वितरित करतील.
ALSO READ: शिंदे-फडणवीसां कडून बीएमसी निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबई आणि धारावीसाठी मोठी आश्वासने दिली
हॉलतिकीट मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करण्यात येणार असून, त्याची छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना देणे महाविद्यालयांना बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
या हॉलतिकीटवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे. हॉल तिकिटासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नसून कोणतीही ऑनलाईन फी भरण्याचीपण गरज नाही.
ALSO READ: 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय
हॉल तिकीटमध्ये नाव, विषय, माध्यम, फोटो किंवा स्वाक्षरी संदर्भात काही त्रुटी आढळल्यास संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी. हॉलतिकीट गहाळ झाल्यास ‘द्वितीय प्रत’ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. एकंदरीत, 12 जानेवारीपासून हॉलतिकीट सहज आणि विनामूल्य उपलब्ध होणार असल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Edited By – Priya Dixit
