मोठी बातमी! आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरले आहे. विधिमंडळाच्या बैठकीत आतिशी यांची निवड नव्या मुख्यमंत्रीच्या पदावर केली आहे.
केजरीवाल यांनी विधिमंडळाच्या पक्षाच्या बैठकीत आतिशीच्या नावाचा प्रस्तावव ठेवला होता. या नावाला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
आता आतिशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे होती. सध्याच्या मंत्रिमंडळ सदस्यांव्यतिरिक्त आतिशी, सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, पूर्व दिल्ली लोकसभा उमेदवार कुलदीप कुमार, विधानसभेच्या उपसभापती राखी बिर्लान आणि इतर नावांचाही समावेश होता. मात्र आतिशीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घ्यावा असा प्रस्ताव सर्व आमदारांनी मान्य केला आणि अरविंद केजरीवालांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. सर्व आमदारांनी उभे राहून या निर्णयाला मंजुरी दिली.
Edited by – Priya Dixit