जून महिना संपला आहे. 1 जुलैपासून देशभरात अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. पॅन कार्ड ते रेल्वे भाड्याशी संबंधित अनेक नियम आहेत. विशेष म्हणजे या नियमांमधील बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.या 8 मोठ्या बदलांबद्दल जाणून घेऊया1) पॅन कार्ड नियमांमध्ये बदल1 जुलै 2025 पासून, नवीन पॅन कार्ड मिळविण्यासाठी आधार कार्ड देणे अनिवार्य झाले आहे. हा नियम केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) लागू केला आहे. याशिवाय, जर तुमच्याकडे आधीच पॅन आणि आधार कार्ड दोन्ही असतील तर ते लिंक करणे देखील आवश्यक आहे. यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.2) रेल्वे भाड्यात वाढ1 जुलैपासून रेल्वेशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाड्यात वाढ. पहिल्या तारखेपासून, नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशाने वाढवण्यात आले आहे. तर एसी क्लासच्या भाड्यात प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. 500 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी दुसऱ्या श्रेणीतील रेल्वे तिकिटांच्या आणि एमएसटीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, परंतु त्यापुढील प्रवासासाठी प्रति किलोमीटर अर्धा पैसा वाढ होईल.3) तात्काळ तिकिट बुकिंगबाबतचे नियमभारतीय रेल्वेने 1 जुलैपासून तात्काळ तिकिट बुकिंगबाबतही बदल केले आहेत. आता फक्त आधार पडताळलेले वापरकर्ते आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवरून तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. यासाठी ओटीपी आधारित प्रमाणीकरण आवश्यक असेल, जे आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर येईल. जर तुमचे खाते आधार पडताळले नसेल, तर तुम्ही तात्काळ तिकिटे बुक करू शकणार नाही.4) रेल्वे प्रवास सुरू होण्याच्या ८ तास आधी चार्ट तयार केला जाईलपूर्वी रेल्वे प्रवास सुरू होण्याच्या 4 तास आधी चार्ट तयार केला जात असे. परंतु 1 जुलै 2025पासून तो बदलण्यात आला आहे. आता प्रवास सुरू होण्याच्या 8 तास आधी चार्ट तयार केला जाईल. याशिवाय, आता तत्काळ तिकिटे बुक करताना, आरक्षणाच्या वेळी आधार कार्डची माहिती द्यावी लागेल.5) UPI चार्जबॅक प्रक्रियेत मोठा बदल – बँकांना थेट परवानगीआतापर्यंत, जर एखाद्या ग्राहकाने UPI व्यवहारावर चार्जबॅकचा दावा केला आणि तो नाकारला गेला, तर बँकेला पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून परवानगी घ्यावी लागत होती. परंतु 20 जून 2025 रोजी जाहीर झालेल्या नवीन नियमांमुळे, आता बँका NPCI ची परवानगी न घेता त्यांच्या विवेकबुद्धीनुसार चार्जबॅकचा दावा पुन्हा प्रक्रिया करू शकतात. याचा थेट फायदा ग्राहकांना होईल आणि पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया आता जलद आणि सोपी होईल.6) GST रिटर्नबाबत कठोर नियम लागू जुलै 2025पासून, GST भरताना GSTR-3B फॉर्म संपादित करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. यामुळे, करदात्यांना दाखल केलेल्या रिटर्नमध्ये दुरुस्त्या करता येणार नाहीत. तसेच, आता कोणताही करदाता तीन वर्षांनंतर मागील तारखेचा GST रिटर्न दाखल करू शकणार नाही. या बदलामुळे कर भरताना अचूकता आणि वेळेवर विवरणपत्रे भरण्याचे महत्त्व वाढेल.7) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपातघरगुती गॅसमध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. 1 जुलैपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 58.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिकांना खर्चात काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तथापि, घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.8) एसटीचे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठी सवलतमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) जाहीर केलेल्या नवीन योजनेनुसार, 1 जुलैपासून 150 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना 15% ची सवलत दिली जाईल. ही सवलत सवलतीच्या प्रवाशांशिवाय सर्व प्रवाशांना लागू आहे. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या वगळता ही योजना वर्षभर लागू असेल.हेही वाचासिद्धीविनायक मंदिराचे सुशोभिकरण 3 टप्प्यात होणार
ठाणे-बोरिवली ट्विन टनल 2028 पर्यंत बांधणार
1 जुलैपासून ‘हे’ 8 मोठे बदल लागू