Solapur Politics : करमाळयात शिवसेनेला मोठा धक्का ; 55 शाखाध्यक्षांनी दिला राजीनामा
दिग्विजय बागल गटातील पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
करमाळा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे.
मात्र आता निवडणूकलागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या नाराजीचा फटका देखील पक्षांना बसत असल्याचे दिसून येत आहे, अशातच मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयवंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे.
