लाडक्या गुलाबाईंना निरोप देताना चाऊमाऊ 32 खाऊ याचे नैवदे्य दाखवा, यादी बघा
“गुलाबाई” हा शब्द मुख्यतः महाराष्ट्रातील लोककला आणि सणांशी संबंधित आहे, विशेषतः भुलाबाई किंवा गुलाबाई या पारंपरिक सणाशी जोडलेला आहे. “गुलाबाई” हे नाव देवी पार्वतीचे प्रतीक आहे, जी या सणात मातीच्या मूर्तीच्या रूपात पूजली जाते. काही ठिकाणी याला “गुलोजी-गुलाबाई” असेही म्हणतात, ज्यात गुलोजी हे शिवाचे रूप असते. तसेच या सणासाठी विशेष मातीच्या मूर्त्या तयार केल्या जातात. मूर्तीत एका बाजूला नऊवारी साडी घातलेली गुलाबाई (पार्वती) बसलेली असते, आणि तिच्या मांडीवर बाळ असते. दुसऱ्या बाजूला गुलोजी (शिव) असतो. भाद्रपद पौर्णिमेला गुलाबाईची स्थापना केली जाते. तर अश्विन कोजागिरी पौर्णिमेला तिचे विसर्जन केले जाते.
तसेच अश्विन कोजागिरी पौर्णिमेला विसर्जनाच्या दिवशी गुबाईला निरोप दिला जातो. व हा निरोप छान नैवेद्य किंवा लहान मुली याला खाऊ म्हणतात. या स्वरूपात दाखवला जातो. अश्विन कोजागिरी पौर्णिमेला जागरण केले जाते. चंद्रप्रकाशात गुलबाईचे गाणे म्हणून आरती केली जाते व तिला नैवेद्य म्हणून ३२ प्रकारचा खाऊ अर्पण केला जातो. आता या खाऊ मध्ये सर्व प्रकारचे पदार्थ असतात. आपल्या यथाशक्ती हा या खाऊ मध्ये पदार्थांचा समावेश केला जातो. तर आपण आज ते ३२ प्रकारचे खाऊ कोणते याची यादी पाहूया….म्हणजे जर तुम्ही देखील सण साजरा करत असाल तर इथे नक्की खाऊ कोणते असावे हे जाणून घ्या…
चाऊमाऊ 32 खाऊची यादी-
१. चिवडा
२. शेव
३.शंकरपाळे
४. पोहे
५. चिप्स
६. मसाला चणे
७. कुरमुरे
८. चकली
९. मटरी
१०. कुकुरे
११. तिखटमिठाची पुरी
१२. कुरडई
१३. बेसन लाडू
१४. राजगिरा लाडू
१५. चॉकलेट
१६. कॅडबरी
१७. पेढा
१८. पेठा
१९. मँगोवडी
२०. खारे शेंगदाणे
२१. सफरचंद
२२. पेरू
२३. चिकू
२५. डाळींब
२६. भजे
२७. भेळ
२८. जिलेबी
२९. सामोसे
३०. बासुंदी
३२. श्रीखंड
ALSO READ: आमची सखी ‘भुलाबाई ‘ लहानपणीची आठवण…..
हे ३२ प्रकारचे खाऊ तुम्ही नैवेद्यात गुलाबाईला नक्कीच दाखवू शकता. व सर्वांना प्रसाद रूपात नक्कीच वाटू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: भुलाबाईची आरती Gulabai Aarti Marathi
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: भुलाबाईची गाणी संपूर्ण Bhulabai Song Marathi