भातकांडे स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
बेळगाव : एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे स्कुलच्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मि. इंडिया व एकलव्य पुरस्कार विजेता रेल्वेचा प्रितम चौगुले, शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील आदी उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते क्रीडाध्वजारोहन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्याना मानवंदना दिली. प्रारंभी स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरवात केली. शाळेचा क्रीडापटू सुदित सासूलकर यांनी क्रीडाज्योत फिरवून पाहुण्याकडे सुपूर्द केली. यावेळी प्रमुख पाहुणे प्रितम चौगुले यांनी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्याना क्रीडा क्षेत्रात त्याना वाव दिल्यास ते नक्कीच शालेय जिवनात खेळात कौशल्य दाखवितील. विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगुन शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक मॅथ्यु लोबो, स्वप्नील, मोहन सह इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
Home महत्वाची बातमी भातकांडे स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
भातकांडे स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
बेळगाव : एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे स्कुलच्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मि. इंडिया व एकलव्य पुरस्कार विजेता रेल्वेचा प्रितम चौगुले, शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील आदी उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते क्रीडाध्वजारोहन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्याना मानवंदना दिली. प्रारंभी स्वागत गिताने कार्यक्रमाची […]