‘भरतेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ कॉलेजला यावर्षीपासून सुरुवात

भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव विनोद दो•ण्णावर यांची पत्रकार परिषदेत माहिती बेळगाव : शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविलेल्या भरतेश एज्युकेशन ट्रस्ट यंदाच्या शैक्षणिक वर्षात ‘भरतेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ हे कॉलेज सुरू करत आहे. सदर कॉलेजला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ची मान्यता असून सदर कॉलेज व्हीटीयूशी सलग्न असेल, अशी माहिती भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव […]

‘भरतेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ कॉलेजला यावर्षीपासून सुरुवात

भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव विनोद दो•ण्णावर यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविलेल्या भरतेश एज्युकेशन ट्रस्ट यंदाच्या शैक्षणिक वर्षात ‘भरतेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ हे कॉलेज सुरू करत आहे. सदर कॉलेजला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ची मान्यता असून सदर कॉलेज व्हीटीयूशी सलग्न असेल, अशी माहिती भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव विनोद दो•ण्णावर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. शिक्षण संस्थांनी काळाची गरज ओळखून नवनवीन अभ्यासक्रमांची ओळख करून देणे आवश्यक आहे. याच हेतूने बसवन कुडचीजवळील चंद्रगिरी कॅम्पस येथे 30 हजार चौरस फुटांच्या इमारतीमध्ये हे कॉलेज सुरू होत आहे. आताच्या विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स (120 जागा), आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड मशीन लर्निंग (60 जागा), इन्फर्मेशन सायन्स (60 जागा) व इलेक्टानिक्स अॅण्ड कम्युनिकेशनसाठी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती देताना प्राचार्य वीणा करकी म्हणाल्या, कर्नाटकातील विद्यार्थ्यांना सीईटीच्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कोमेड-के.च्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. अकॅडमिक अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा यासाठी अनेक औद्योगिक आस्थापनांशी
कॉलेजने समन्वय करार केला आहे. विद्यार्थ्यांना प्लेसमेट संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिनेही कॉलेज कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससुविधाही असल्याचे त्यांनी सांगितले. हुशार परंतु गरीब विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत असणार का? या प्रश्नावर जो विद्यार्थी सीईटीमध्ये 5 हजार रँकिंगच्या आत असेल त्याला निश्चितच सवलत दिली जाईल तर 10 हजार रँकिंगच्या आत असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा काही प्रमाणात सवलत दिली जाईल. या शिवाय गुणवान विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीही दिली जात आहे, ज्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, खेळासाठी भव्य पटांगण, आधुनिक प्रयोगशाळा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, उपाहारगृह व वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध असतील, असे प्रशासक गोमटेश रावण्णवर यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे, खजिनदार भूषण मिरजी, कार्यकारी मंडळाचे सदस्य हिराचंद कलमनी, अशोक दनवाडे, शरदकुमार पाटील, डॉ. सावित्री दो•ण्णावर, संजीव दो•णावर, राजेंद्र रामगौंडा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.