भांबरी-हॅसचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ दुबई एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई ड्युटी फ्री पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांबरी आणि त्याचा साथिदार रॉबीन हॅस यांचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. पुरूष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशियाचा इव्हान डोडीग आणि अमेरिकेचा क्रेजीसेक या जोडीने भांबरी आणि हॅस यांचा 6-3, 7-6 (7-2) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा […]

भांबरी-हॅसचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई ड्युटी फ्री पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांबरी आणि त्याचा साथिदार रॉबीन हॅस यांचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले.
पुरूष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशियाचा इव्हान डोडीग आणि अमेरिकेचा क्रेजीसेक या जोडीने भांबरी आणि हॅस यांचा 6-3, 7-6 (7-2) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्य सामना 80 मिनिटे चालला होता.