केदनूर येथे भजन, कीर्तन कार्यक्रम
वार्ताहर /कडोली
केदनूर येथे अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याचे औचित्य साधून देवस्थान पंच कमिटीतर्फे येथील राजाई गल्लीतील ग्रा. पं. माजी सदस्य चाळोबा लाड यांच्याहस्ते सुमारे 75 फूट उंच ध्वजस्तंभाचे पूजन केल्यानंतर उत्सवाला प्रारंभ झाला. टाळ मृदंगाच्या गजरात आणि कलश घेऊन सहभागी झालेल्या सुवासिनींच्या उपस्थितीत श्रीराम मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर भजन, पूजा-अर्चाचे कार्यकम पार पडल्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. चाळोबा लाड, नारायण पाटील, देवस्थान पंचकमिटी, हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Home महत्वाची बातमी केदनूर येथे भजन, कीर्तन कार्यक्रम
केदनूर येथे भजन, कीर्तन कार्यक्रम
वार्ताहर /कडोली केदनूर येथे अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याचे औचित्य साधून देवस्थान पंच कमिटीतर्फे येथील राजाई गल्लीतील ग्रा. पं. माजी सदस्य चाळोबा लाड यांच्याहस्ते सुमारे 75 फूट उंच ध्वजस्तंभाचे पूजन केल्यानंतर उत्सवाला प्रारंभ झाला. टाळ मृदंगाच्या गजरात आणि कलश घेऊन सहभागी झालेल्या […]
