कोस्टल रोडवर एसी बस धावणार
बहुचर्चित कोस्टल रोडवरून आजपासून (शुक्रवार) वातानुकूलित बेस्ट बस धावणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रवाशांचा कोस्टल रोडवरून गारेगार प्रवास तितकाच आल्हाददायक असेल. बेस्टची ए-78 क्रमांकाची बस एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक (प.) दरम्यान मरिन ड्राइव्ह, ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्गे’ धावणार आहे.कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा 11 मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान 12 मार्चपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर 10 जून रोजी मरीन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन 10 जूनपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका गुरुवार, 11 जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. आतापर्यंत बेस्ट बसेसना वाहतुकीसाठी परवानगी नव्हती. तथापि, आता बेस्ट प्रवाशांची प्रतीक्षा संपली असून, शुक्रवारपासून प्रवाशांना वातानुकूलित बसने कोस्टल रोडची सफर करता येणार आहे.ही वातानुकूलित बस ब्रीच कॅन्डी रुग्णालय, हाजीअली, महालक्ष्मी स्थानक मार्गे धावणार आहे. हा बस मार्ग एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) हॉटेल ट्रायडेंट नेताजी सुभाष मार्ग मरिन ड्राइव्ह – ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्ग’ (कोस्टल रोड), पारसी जनरल रुग्णालय जंक्श्न- वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली)- महालक्ष्मी रेसकोर्स- महालक्ष्मी रेल्वे स्थानक – सात रस्ता भायखळा स्थानक (प). असा असेल. एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) येथून बस सकाळी 8.50 वाजता सुटेल आणि शेवटची बस सायंकाळी 9 वाजता सुटेल, तर भायखळा स्थानक (प.) येथून सकाळी 8 वाजता सुटेल. शेवटची बस रात्री 8.50 वाजता सुटेल. या बसचे प्रवास भाडे किमान 6 रुपये, तर कमाल भाडे 19 रुपये आकारण्यात येईल. या बसमार्गावरील बसगाड्या संपूर्ण आठवडाभर कार्यान्वित राहतील. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.दहा तासांत पंधराशे वाहनांचा प्रवासकोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा 11 मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान 12 मार्चपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर 10 जूनपासून रोजी मरिन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका गुरुवार, 11 जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 1500 वाहनांनी या मार्गावरून पहिल्याच दिवशी प्रवास केला.हेही वाचाअटल सेतूनंतर आता समृद्धी कॉरिडॉर मार्गाला तडे
बेस्टच्या बस स्टॉपवरील VOGOची ई-बाईक सेवा बंद
Home महत्वाची बातमी कोस्टल रोडवर एसी बस धावणार
कोस्टल रोडवर एसी बस धावणार
बहुचर्चित कोस्टल रोडवरून आजपासून (शुक्रवार) वातानुकूलित बेस्ट बस धावणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रवाशांचा कोस्टल रोडवरून गारेगार प्रवास तितकाच आल्हाददायक असेल. बेस्टची ए-78 क्रमांकाची बस एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक (प.) दरम्यान मरिन ड्राइव्ह, ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्गे’ धावणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा 11 मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान 12 मार्चपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर 10 जून रोजी मरीन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन 10 जूनपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका गुरुवार, 11 जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
आतापर्यंत बेस्ट बसेसना वाहतुकीसाठी परवानगी नव्हती. तथापि, आता बेस्ट प्रवाशांची प्रतीक्षा संपली असून, शुक्रवारपासून प्रवाशांना वातानुकूलित बसने कोस्टल रोडची सफर करता येणार आहे.
ही वातानुकूलित बस ब्रीच कॅन्डी रुग्णालय, हाजीअली, महालक्ष्मी स्थानक मार्गे धावणार आहे. हा बस मार्ग एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) हॉटेल ट्रायडेंट नेताजी सुभाष मार्ग मरिन ड्राइव्ह – ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्ग’ (कोस्टल रोड), पारसी जनरल रुग्णालय जंक्श्न- वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली)- महालक्ष्मी रेसकोर्स- महालक्ष्मी रेल्वे स्थानक – सात रस्ता भायखळा स्थानक (प). असा असेल. एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) येथून बस सकाळी 8.50 वाजता सुटेल आणि शेवटची बस सायंकाळी 9 वाजता सुटेल, तर भायखळा स्थानक (प.) येथून सकाळी 8 वाजता सुटेल.
शेवटची बस रात्री 8.50 वाजता सुटेल. या बसचे प्रवास भाडे किमान 6 रुपये, तर कमाल भाडे 19 रुपये आकारण्यात येईल. या बसमार्गावरील बसगाड्या संपूर्ण आठवडाभर कार्यान्वित राहतील. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.
दहा तासांत पंधराशे वाहनांचा प्रवास
कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा 11 मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान 12 मार्चपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर 10 जूनपासून रोजी मरिन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका गुरुवार, 11 जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 1500 वाहनांनी या मार्गावरून पहिल्याच दिवशी प्रवास केला.हेही वाचा
अटल सेतूनंतर आता समृद्धी कॉरिडॉर मार्गाला तडेबेस्टच्या बस स्टॉपवरील VOGOची ई-बाईक सेवा बंद