गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात
मुंबईतील (mumbai) गिरगावात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसला अपघात झाला आहे. बेस्ट जात असलेल्या मार्गावरील रस्ता खचल्याने बस थेट पाच फूट खोल खड्ड्यात गेली आहे. गिरगावमधी रहदारीच्या या रस्त्यावर घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.कुलाबा – वांद्रे सीप्झ येथील गिरगाव (girgaon) मेट्रो स्टेशनजवळ मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता खचला (cave in) आणि बसचं चाक खचलेल्या रस्त्यात पाच फूट खाली खोल खड्ड्यात गेलं आहे. सकाळच्या वेळी या रस्त्यावर कामावर निघालेल्या लोकांची मोठी संख्या असते. त्यामुळे या मार्गावर बसदेखील सतत चालवल्या जातात. महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातात बसमधील सर्व प्रवासी तसंच चालकदेखील सुखरुप आहेत. कोणलाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 16 जून रोजी सकाळी रस्ता खचून अपघात (accident) झाला.जिथे अपघात झाला त्याठिकाणी गेल्या वर्षी मेट्रोच्या कामासाठी असलेली अवजड क्रेन उभी होती. ती क्रेन खाली रस्त्यावर पडली होती. त्यावेळी हा आता अपघात झालेला मार्ग तीन दिवस बंद होता. कुचकामी अधिकाऱ्यांमुळे आज घडलेली बस अपघाताची परिस्थिती उद्भवल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.रस्ता खचला त्याठिकाणी अशी कोणतीही कारवाई करू शकत नाही, मात्र तरीही दिवस-रात्र मेट्रोचं काम सुरू आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करुनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. रहदारीच्या रस्त्यावर कोणतीही काळजी न घेता काम सुरू आहे, अशा तक्रारी परिसरातील स्थानिकांकडून केल्या जात आहेत. मेट्रोच्या कामामुळे हा रस्त्या खचल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई गेली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.हेही वाचामहानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय वॉर्ड प्रणाली लागू करणारमुंबई ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस
Home महत्वाची बातमी गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात
गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात
मुंबईतील (mumbai) गिरगावात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसला अपघात झाला आहे. बेस्ट जात असलेल्या मार्गावरील रस्ता खचल्याने बस थेट पाच फूट खोल खड्ड्यात गेली आहे. गिरगावमधी रहदारीच्या या रस्त्यावर घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
कुलाबा – वांद्रे सीप्झ येथील गिरगाव (girgaon) मेट्रो स्टेशनजवळ मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता खचला (cave in) आणि बसचं चाक खचलेल्या रस्त्यात पाच फूट खाली खोल खड्ड्यात गेलं आहे. सकाळच्या वेळी या रस्त्यावर कामावर निघालेल्या लोकांची मोठी संख्या असते. त्यामुळे या मार्गावर बसदेखील सतत चालवल्या जातात.
महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातात बसमधील सर्व प्रवासी तसंच चालकदेखील सुखरुप आहेत. कोणलाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 16 जून रोजी सकाळी रस्ता खचून अपघात (accident) झाला.
जिथे अपघात झाला त्याठिकाणी गेल्या वर्षी मेट्रोच्या कामासाठी असलेली अवजड क्रेन उभी होती. ती क्रेन खाली रस्त्यावर पडली होती. त्यावेळी हा आता अपघात झालेला मार्ग तीन दिवस बंद होता. कुचकामी अधिकाऱ्यांमुळे आज घडलेली बस अपघाताची परिस्थिती उद्भवल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
रस्ता खचला त्याठिकाणी अशी कोणतीही कारवाई करू शकत नाही, मात्र तरीही दिवस-रात्र मेट्रोचं काम सुरू आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करुनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
रहदारीच्या रस्त्यावर कोणतीही काळजी न घेता काम सुरू आहे, अशा तक्रारी परिसरातील स्थानिकांकडून केल्या जात आहेत. मेट्रोच्या कामामुळे हा रस्त्या खचल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई गेली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.हेही वाचा
महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय वॉर्ड प्रणाली लागू करणार
मुंबई ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस
