बेन स्टोक्सने क्रिकेट बऱ्याच अर्थाने बदलले : ऑली पोप

इंग्लंडचा कर्णधार कारकिर्दीतील 100 वी कसोटी लढत खेळण्यास सज्ज वृत्तसंस्था/ राजकोट इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने क्रिकेटचा खेळ बऱ्याच अर्थाने बदलला आहे, असे मत त्यांचा फलंदाज ऑली पोपने व्यक्त केले आहे. सध्या अष्टपैलू स्टोक्स आपला 100 वा कसोटी सामना खेळण्याची तयारी करत आहे. . अत्यंत दबावाच्या परिस्थितीत खेळाच्या इतिहासातील काही उत्कृष्ट खेळी खेळून स्वत:साठी एक वेगळे […]

बेन स्टोक्सने क्रिकेट बऱ्याच अर्थाने बदलले : ऑली पोप

इंग्लंडचा कर्णधार कारकिर्दीतील 100 वी कसोटी लढत खेळण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ राजकोट
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने क्रिकेटचा खेळ बऱ्याच अर्थाने बदलला आहे, असे मत त्यांचा फलंदाज ऑली पोपने व्यक्त केले आहे. सध्या अष्टपैलू स्टोक्स आपला 100 वा कसोटी सामना खेळण्याची तयारी करत आहे. .
अत्यंत दबावाच्या परिस्थितीत खेळाच्या इतिहासातील काही उत्कृष्ट खेळी खेळून स्वत:साठी एक वेगळे स्थान स्टोक्सने निर्माण केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ‘बाझबॉल’ म्हणून ओळखला जाणारा एक नवीन दृष्टिकोन आणण्याबरोबर एक कर्णधार म्हणूनही त्याने उत्कृष्ट छाप पाडली आहे. पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमधील इंग्लंडच्या पुनऊज्जीवनातही महत्त्वाची भूमिका बजावलेला स्टोक्स कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 100 हून अधिक सामने खेळलेल्या निवडक खेळाडूंच्या यादीत सामील होण्याच्या मार्गावर आहे.
त्याने बहुधा खेळात अनेक बाबतीत बदल घडविले आहेत. संघाला आवश्यक असताना सर्वोत्तम कामगिरी करून दाखविण्याचा मार्ग त्याला मिळाला आहे. अॅशेसमध्ये सुद्धा लॉर्ड्सवर मला आठवते की, त्याच्यावर सारे दडपण असताना तो खेळ एका वेगळ्या स्तरावर कसा काय नेतो याचा मी विचार करत होतो, असे पोपने मंगळवारी इंग्लंडच्या सराव सत्रानंतर एससीए स्टेडियमच्या ठिकाणी माध्यमांना सांगितले.
गुऊवारपासून इंग्लंडची भारताविऊद्धची तिसरी कसोटी रंगणार आहे. आतापर्यंतच्या 99 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने जितक्या वेळा तशी कामगिरी करून दाखविलेली आहे ते पाहिल्यास अविश्वसनीय आहे. 100 कसोटी खेळणे ही कोणासाठीही अविश्वसनीय कामगिरी आहे. त्याच्या कारकिर्दीत चढ-उतार निश्चितच राहिलेला आहे. परंतु त्याने कर्णधार बनल्यापासून जे काही केले आहे ते आश्चर्यकारक आहे आणि त्याच्या कारकिर्दीत असे बरेच खास क्षण आहेत ज्याकडे तो मागे वळून पाहू शकतो, असे पोप पुढे म्हणाला.
पोपच्या मते, स्टोक्सच्या मनुष्य-व्यवस्थापन कौशल्याने त्याला इतर कर्णधारांपेक्षा वेगळे ठरविले आहे. त्याने जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा मी अकरा खेळाडूंत होतो. त्याने हे अगदी स्पष्टपणे सांगितले की, मी क्रमांक 3 चा खेळाडू आहे आणि त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला, याकडे पोपने लक्ष वेधले आहे.
स्टोक्सला गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करावा लागल्यामुळे तो चालू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत गोलंदाजीचा भार उचण्यापासून दूर राहिला आहे. मात्र मंगळवारी दुपारी इंग्लंडचा कर्णधार पूर्ण जोमाने गोलंदाजी करताना दिसला. असे असले, तरी स्टोक्स मालिकेच्या उर्वरित सामन्यांत गोलंदाजी करण्याची तयारी करत असल्याचे पोपने नाकारले.