लाडक्या बहिणींना 2100 कधी; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर
राज्यातील बहिणींसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. ज्या बहिणींच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे. अशा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून खात्यात जमा केले जाते. या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
ALSO READ: मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका
महायुती सरकारकडून या राशीमध्ये वाढ करून दरमहा 2100 रुपये लाभार्थी महिलांना देण्यात येतील असे आश्वासन दिले गेले. मात्र आता त्याला देखील एक वर्ष झाला आहे आणि अद्याप देखील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. महिलांना 2100 रुपये कधी पासून मिळणार या बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठं विधान केलं आहे.
ALSO READ: वणीमध्ये शेतकऱ्यांच्या ओळखपत्राशिवाय कर्जमाफी नाही, पाच वर्षांचा डेटा आवश्यक
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी या योजनेची घोषणा राज्य सरकार ने केली असून या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला असून लाडक्या बहिणींनी मोठा विश्वास दाखवत महायुतीला स्पष्ट बहुमताने आणले.
आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करताना ते म्हणाले, या योजनेत काहींनी खोडा घातला. या योजनेसाठी वर्षाला 45 हजार कोटी रुपयांचा खर्च होता. आम्ही धाडस केलं. या योजनेत अडथळा आणणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी चांगला धडा शिकवला.आम्ही 232 जागा निवडणून आलो.
ALSO READ: अमरावती बोर्डाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा हेल्पलाइन सुरू केली
1500 चे 2100 रुपये योग्य वेळी करणार अशा शब्द दिला होता. आम्ही आपल्या शब्दांवर ठाम आहोत. आम्ही दिलेला शब्द पाळणार. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार.असे या वेळी ते म्हणाले.
Edited By – Priya Dixit
