आम्ही चंदगडी मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावकरांचा डंका
वार्ताहर /कार्वे
युवा स्पोर्टस् क्लब चंदगड, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी आणि संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आम्ही चंदगडी मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावच्या सुशांत जेधे याने खुल्या गटात प्रथम, 17 वर्षाखालील लहान गट मुलीमध्ये प्राजक्ता शिंदे तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात ऋतिक वर्मा यांने प्रथम क्रमांक पटकाविला. पाटणे फाटा एमआयडीसी येथे या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही गटात सीमा भागातील स्पर्धकांनी यश संपादन केले. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य गोपाळराव पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, दौलतचे उपाध्यक्ष संजय पाटील, माजी उपसभापती मनिषा शिवनगेकर, सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, निवृत्ती हारकारे, भाजप सरचिटणीस विद्या पाटील, अनिल शिवनगेकर, हरिभाऊ पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व ध्वज दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले.
प्रथम 17 वर्षाखालील लहान गट मुलींची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ममता पाटील, गायत्री पाटील, सृष्टी मूर्ती, भूमी बेळगावकर, जानवी मोहनगेकर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. 17 वर्षा खालील मुले गटात समर्थ एकसंबे, दत्ता पाटील, समर्थ सावंत, पृथ्वीराज कांबळे, ओमकार आर्दाळकर, अनिल गावडे, रमेश पाटील, मोहन पाटील, वेदांत कुपेकर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. तर खुल्या गटात प्रधान किऊळकर, अनिकेत कुटे, हरिदास शिंदे, सुरेश नाडीकर, एस. एच. मुतुराज, शिवराज घोलारखे, शुभम तावळे, बबन शिंदे, राम वाघेल यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. या तिन्ही गटांमध्ये बेळगाव भागातील स्पर्धकांनी आपले वर्चस्व गाजविले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पांडुरंग मोहनगेकर, सुरज हारकारे, रवी कोनेवाडकर, श्री. पिटुक आदिनी परिश्र्रम घेतले.
Home महत्वाची बातमी आम्ही चंदगडी मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावकरांचा डंका
आम्ही चंदगडी मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावकरांचा डंका
वार्ताहर /कार्वे युवा स्पोर्टस् क्लब चंदगड, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी आणि संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आम्ही चंदगडी मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावच्या सुशांत जेधे याने खुल्या गटात प्रथम, 17 वर्षाखालील लहान गट मुलीमध्ये प्राजक्ता शिंदे तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात ऋतिक वर्मा यांने प्रथम क्रमांक पटकाविला. पाटणे फाटा एमआयडीसी येथे या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन […]