बेळगावला डावलले, हुबळीला सावरले
फेब्रुवारीपासून पुण्यासाठी हुबळीतून विमानफेरी : प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
बेळगाव : बेळगावमधून पुण्याला विमानसेवा पूर्ववत करा, अशी मागील अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. परंतु, बेळगावला वगळून येत्या 2 फेब्रुवारीपासून पुणे-हुबळी मार्गावर विमानफेरी सुरू होत आहे. यामुळे इंडिगो एअरलाईन्सने बेळगावला पुन्हा एकदा डावलल्याचे स्पष्ट होत आहे. बेळगावमधील हजारो नागरिक पुणे येथे नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक आहेत. त्यामुळे त्यांची बेळगावला ये-जा असते. लॉकडाऊनपूर्वी अलायन्स एअर कंपनीकडून बेळगाव-पुणे मार्गावर विमानफेरी सुरू होती. या विमानफेरीला तुफान प्रतिसाद मिळत होता. अवघ्या एक तासामध्ये बेळगावमधून पुण्याला पोहोचता येत होते. परंतु, तांत्रिक कारणाने अलायन्स एअरने विमानसेवा बंद केली.
प्रवाशांची गैरसोय
बेळगावमध्ये अनेक लहानमोठे उद्योग असून त्यांची कॉर्पोरेट कार्यालये पुणे येथे आहेत. हुबळीपेक्षा बेळगावला विमानफेरीची गरज आहे. परंतु, बेळगावला वगळून पुणे-हुबळी मार्गावर विमानफेरी सुरू करण्यात येत आहे. बेळगावसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बेळगाव-पुणे व बेळगाव-नाशिक या विमानफेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी बेळगाव-पुणे मार्गावर विमानफेरी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
लॉकडाऊनपासून बेळगाव-पुणे विमानफेरी बंद
बेळगाव आणि पुणे या दोन शहरांमध्ये शिक्षण, व्यापार, उद्योग यामध्ये देवाणघेवाण होत असते. त्यामुळे या दोन्ही शहरांमधून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. परंतु, लॉकडाऊनपासून बेळगाव-पुणे विमानफेरी बंद आहे. बेळगाव-पुणे विमानफेरीची मागणी होत असताना येत्या फेब्रुवारीपासून पुणे-हुबळी विमानफेरी सुरू होत आहे.
– धैर्यशील वंडेकर (प्रवासी)
Home महत्वाची बातमी बेळगावला डावलले, हुबळीला सावरले
बेळगावला डावलले, हुबळीला सावरले
फेब्रुवारीपासून पुण्यासाठी हुबळीतून विमानफेरी : प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय बेळगाव : बेळगावमधून पुण्याला विमानसेवा पूर्ववत करा, अशी मागील अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. परंतु, बेळगावला वगळून येत्या 2 फेब्रुवारीपासून पुणे-हुबळी मार्गावर विमानफेरी सुरू होत आहे. यामुळे इंडिगो एअरलाईन्सने बेळगावला पुन्हा एकदा डावलल्याचे स्पष्ट होत आहे. बेळगावमधील हजारो नागरिक पुणे येथे नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक आहेत. त्यामुळे […]