बेळगाव-सुरत व्हाया किशनगड विमानसेवा होणार रद्द
बेळगाव : बेळगाव-सुरत व्हाया किशनगड (अजमेर) विमानसेवा 14 जूनपासून रद्द करण्यात आली आहे. स्टार एअरने विमानफेरी रद्द करत असल्याचे सांगितल्यामुळे सुरत, तसेच अजमेर येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. स्टार एअरने मागील काही दिवसांत अनेक उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. स्टार एअर कंपनीकडून मुंबई, जोधपूर, सुरत, तिरुपती, नागपूर, जयपूर, बेंगळूर यासह इतर शहरांना विमानसेवा दिली जात होती. परंतु मागील काही दिवसांत विमानफेऱ्या वारंवार रद्द केल्या जात होत्या. सोमवारी तिरुपती-बेळगाव विमानफेरी अचानक रद्द करण्यात आली होती. यामुळे तिरुपती विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला. उडान-3 योजनेतून बेळगाव-सुरत विमानफेरीला मंजुरी देण्यात आली होती. 2020 पासून ही विमानफेरी कार्यरत होती. सुरत येथे कापडाचे मोठे मार्केट असल्यामुळे बेळगावमधील अनेक उद्योजक विमानाने ये-जा करीत होते. 90 टक्क्यांहून अधिक प्रवासी असतानाही कंपनीने विमानफेरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानफेरीचे बुकिंगही काही दिवसांपासून बंद आहे. ही विमानफेरी सुरत मार्गे अजमेरला जोडण्यात आली होती. त्यामुळे बेळगाव-अजमेर प्रवास करणाऱ्यांनाही यापुढे फटका बसणार आहे.
Home महत्वाची बातमी बेळगाव-सुरत व्हाया किशनगड विमानसेवा होणार रद्द
बेळगाव-सुरत व्हाया किशनगड विमानसेवा होणार रद्द
बेळगाव : बेळगाव-सुरत व्हाया किशनगड (अजमेर) विमानसेवा 14 जूनपासून रद्द करण्यात आली आहे. स्टार एअरने विमानफेरी रद्द करत असल्याचे सांगितल्यामुळे सुरत, तसेच अजमेर येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. स्टार एअरने मागील काही दिवसांत अनेक उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. स्टार एअर कंपनीकडून मुंबई, जोधपूर, सुरत, तिरुपती, नागपूर, जयपूर, बेंगळूर यासह […]