बेळगाव स्पोर्टस् क्लब संघ उपविजेता
हुबळी स्पोर्टस् क्लबकडे इलिफिन चषक : स्वप्नील हेळवे मालिकावीर
बेळगाव : हुबळी येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त हुबळी क्रिकेट अकादमीच्या सुवर्ण वर्षांनिमित्त इलिफिन चषक निमंत्रितांच्या टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हुबळी स्पोर्टस् क्लबने बेळगाव स्पोर्टस् क्लबचा 5 गड्याने पराभव करून इलिफिन चषक पटकाविला. बेळगावच्या स्वप्नील हेळवेला मालिकावीराने गौरविण्यात आले. हुबळी येथे कर्नाटक जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्टस् क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 208 धावा केल्या. त्यात ओमकार वेर्णेकरने 5 षटकार, 2 चौकारांसह 51, कर्णधार स्वप्नील हेळवेने 3 षटकार, 3 चौकारसह 31 चेंडूत 40, विजय पाटील व पार्थ पाटील यांनी 2 षटकार, 4 चौकारांसह प्रत्येकी 36 तर केदारनाथ उसूलकरने 2 षटकारांसह 20 धावा केल्या. हुबळी स्पोर्टस् क्लबतर्फे आकाश पत्तारने 44 धावांत 3 तर रोहन यारिसिमी व रोहित यांनी प्रत्येक एक गडी बाद केला.
प्रत्युउत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्टस् क्लबने 20 षटकात 5 गडी बाद 211 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात अजिम जी ने 10 षटकार व 3 चौकारांसह 44 चेंडूत 90, सुदन्वा कुलकर्णीने 3 षटकार 5 चौकारांसह 43 चेंडूत 59, आकाश पत्तारने 4 षटकारसह 25 तर विठ्ठल हबीब व डावनिक फर्नांडिस यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस् क्लबतर्फे रोहित पाटीलने 52 धावात 2, पार्थ पाटील, ओमकार वेर्णेकर व हर्ष पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या हुबळी स्पोर्टस् क्लबला आकर्षक चषक व रोख 75 हजार रुपये व उपविजेत्या बेळगाव स्पोर्टस् क्लबला 50 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर आकाश पत्तार हुबळी, उत्कृष्ट फलंदाज सुदन्वा कुलकर्णी हुबळी, उत्कृष्ट गोलंदाज आकाश पत्तार हुबळी तर मालिकावीर स्वप्नील हेळवे बेळगाव यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी संगम पाटील, सुजय सातेरी, मुक्कण्णवर आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी बेळगाव स्पोर्टस् क्लब संघ उपविजेता
बेळगाव स्पोर्टस् क्लब संघ उपविजेता
हुबळी स्पोर्टस् क्लबकडे इलिफिन चषक : स्वप्नील हेळवे मालिकावीर बेळगाव : हुबळी येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त हुबळी क्रिकेट अकादमीच्या सुवर्ण वर्षांनिमित्त इलिफिन चषक निमंत्रितांच्या टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हुबळी स्पोर्टस् क्लबने बेळगाव स्पोर्टस् क्लबचा 5 गड्याने पराभव करून इलिफिन चषक पटकाविला. बेळगावच्या स्वप्नील हेळवेला मालिकावीराने गौरविण्यात आले. हुबळी येथे कर्नाटक जिमखाना मैदानावर खेळविण्यात […]