बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी, सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब विजयी
केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने इंडियन बॉईज अ संघाचा तर सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब अ संघाने हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाचा पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळवले. अर्णव कुंदप, व अमरदीप पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब सीने प्रथम फलंदाजी करताना 20.5 षटकात सर्व गडी बाद 122 धावा केल्या. त्यात आर्यन गवळीने 3 चौकारांसह 26, प्रवीण कराडेने 24, अभिषेक रायकरने 21 तर श्रीशैल जाधवने 19 धावा केल्या. इंडियन बॉईज तर्फे आरसाण शेखने 32 धावात 4, किरण येळगुकरने 23 धावात 3, अरबाजने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज संघाचा डाव 19.1 षटकात सर्व गडीबाद 82 धावात आटोपला. त्यात आरसाण शेखने 20 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे अर्णव कुंदपणे 22 धावात 4, प्रवीण कराडने 25 धावात 3 गडी बाद केले. दुपारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाने प्रथम फलंदाजी करताना 28.5 षटकात सर्व गडी बाद 164 धावा केल्या. त्यात इम्रान कुशगलने 10 चौकारांसह 67, आयुष्य पाटीलने 7 चौकारांसह 43 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे अमोल यल्लुपाचेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर स्पोर्ट्स संघाने 26.3 षटकात 8 गडी बाद 165 धावा करून सामना 2 गड्यानी जिंकला. त्यात अमरदीप पाटीलने 4 चौकारांसह नाबाद 44, अनुराग पाटीलने 4 चौकारासह 26 तर संतोष चव्हाणने 24 धावा केल्या. हुबळीतर्फे विनय एस एन., श्रेयश गुंजाळ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
Home महत्वाची बातमी बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी, सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब विजयी
बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी, सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब विजयी
केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने इंडियन बॉईज अ संघाचा तर सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब अ संघाने हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाचा पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळवले. अर्णव कुंदप, […]