बेळगाव-मिरज रेल्वेसेवा पूर्ववत

दुरूस्तीकाम पूर्ण झाल्याने वाहतूक सुरळीत बेळगाव : सांगली ते मिरज या रेल्वेस्थानकांदरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात आल्याने मागील आठवडाभरापासून बेळगाव ते मिरज दरम्यानची रेल्वेसेवा कोलमडली होती. शुक्रवार दि. 19 पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने शनिवारपासून रेल्वेसेवा पूर्ववत झाली. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. मिरज-घटप्रभा आणि मिरज-विजयनगर या मार्गावर दुहेरीकरणाच्या कामामुळे मागील 20 दिवसांपासून टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात […]

बेळगाव-मिरज रेल्वेसेवा पूर्ववत

दुरूस्तीकाम पूर्ण झाल्याने वाहतूक सुरळीत
बेळगाव : सांगली ते मिरज या रेल्वेस्थानकांदरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात आल्याने मागील आठवडाभरापासून बेळगाव ते मिरज दरम्यानची रेल्वेसेवा कोलमडली होती. शुक्रवार दि. 19 पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने शनिवारपासून रेल्वेसेवा पूर्ववत झाली. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. मिरज-घटप्रभा आणि मिरज-विजयनगर या मार्गावर दुहेरीकरणाच्या कामामुळे मागील 20 दिवसांपासून टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येत होता. यामुळे सांगली-मिरजकडे जाणाऱ्या पॅसेंजर, त्याचबरोबर एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. काही एक्स्प्रेसच्या मार्गात बदल झाला तर काही रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांना अलीकडच्या रेल्वेस्थानकात उतरून तेथून बसने पुढचा प्रवास करावा लागला. मध्यरेल्वेने 98 तासांच्या ब्लॉकमध्ये 10 किलोमीटरच्या रेल्वे दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. यासाठी तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावत होती. यामुळे प्रवाशांना बेळगावमधून बसने कोल्हापूर-मिरज गाठावे लागत होते. याबरोबरच हुबळी ते मिरज दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर काही रेल्वेस्थानकांदरम्यान रद्द करण्यात आली. तर मिरज-कॅसलरॉक, लेंढा-मिरज, हुबळी-मिरज या एक्स्प्रेस शेडबाळ रेल्वेस्थानकापर्यंतच धावत होत्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. परंतु, आता शनिवारपासून रेल्वेमार्ग खुला झाल्याने वाहतूक सुरळीत पद्धतीने सुरू आहे.
थंडीचा रेल्वेसेवेवर परिणाम
उत्तर भारतात सध्या थंडीची लाट सुरू असल्याने याचा परिणाम रेल्वेच्या गतीवर होत आहे. थंडी अधिक असल्याने रात्रीच्या वेळी रेल्वेची गती कमी करावी लागत आहे. याचा परिणाम लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसवर रविवारी देखील झाला. हजरत निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस रविवारी तब्बल 13 तास 10 मिनिटे उशिराने धावत होती. तर चंदीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस 3 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकात थांबून वाट पहावी लागली.