बेळगाव-लातूर बससेवेला चालना

आरामदायी बस सुसाट : प्रवाशांना दिलासा बेळगाव : बेळगाव-लातूर मार्गावर अत्याधुनिक नवीन पालखी बससेवेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. परिवहनचे विभागीय नियंत्रक गणेश राठोड, डीटीओ के. के. लमाणी, डेपो मॅनेंजर ए. वाय. शिरगुप्पीकर आदींच्या उपस्थितीत या विशेष बसला चालना देण्यात आली. या आरामदायी बससेवेमुळे बेळगाव-लातूर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून रात्री 8 […]

बेळगाव-लातूर बससेवेला चालना

आरामदायी बस सुसाट : प्रवाशांना दिलासा
बेळगाव : बेळगाव-लातूर मार्गावर अत्याधुनिक नवीन पालखी बससेवेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. परिवहनचे विभागीय नियंत्रक गणेश राठोड, डीटीओ के. के. लमाणी, डेपो मॅनेंजर ए. वाय. शिरगुप्पीकर आदींच्या उपस्थितीत या विशेष बसला चालना देण्यात आली. या आरामदायी बससेवेमुळे बेळगाव-लातूर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून रात्री 8 वाजता ही बस सुटणार आहे. जमखंडी, विजापूर, सोलापूर, तुळजापूरमार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 वाजता लातूर येथे पोहोचणार आहे. परत लातूर येथून सायंकाळी 7.30 वाजता बेळगावच्या दिशेने निघणार आहे. तुळजापूर, सोलापूर, विजापूर, जमखंडी मार्गे पहाटे 5.30 वाजता बेळगावात पोहोचणार आहे. या पालखी विशेष बसमुळे जमखंडी, विजापूर, सोलापूर, तुळजापूर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. या मार्गावरील प्रवाशांना खासगी बसने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसत होता. मात्र आता परिवहनने अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेली विशेष बस सोडली आहे. त्यामुळे प्रवाशांना या आरामदायी बसने प्रवास करणे शक्य झाले आहे. या बससेवेमुळे तुळजापूरला जाणाऱ्या भक्तांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर, तुळजापूर बरोबर लातूरला जाणेही सोयिस्कर होणार आहे.
घर बसल्या बुकिंग
पालखी बसचे घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. परिवहनने अॅप तयार केले आहे. या माध्यमातून प्रवाशांना घरबसल्या तिकीटचे बुकिंग करता येणार आहे. याचबरोबर www.क्srtम्.ग्ह या वेबसाईटवरही तिकीट बुकिंग होणार आहे.