बेळगाव-दिल्ली विमानफेरी काही दिवस रद्द
प्रजासत्ताक दिन कवायतींमुळे इंडिगो एअरलाईन्सचा निर्णय : प्रवाशांमधून नाराजी
बेळगाव : बेळगाव-दिल्ली विमानफेरी पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय इंडिगो एअरलाईन्सने घेतला आहे. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम असल्याने इंडिगोने 19 ते 26 जानेवारी दरम्यान विमानफेरी रद्द केली आहे. परंतु, यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव-दिल्ली विमानफेरीमुळे केवळ बेळगावच नाही तर सांगली, कोल्हापूर व कोकणातूनही देशाच्या राजधानीला पोहोचणे शक्य झाले. त्यामुळे अल्पावधीतच या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दररोज शंभरहून अधिक प्रवासी दिल्लीहून बेळगावला येतात. तर तितकेच प्रवासी बेळगावहून दिल्लीला जातात. बेळगावमध्ये एअरमन ट्रेनिंग स्कूल, मराठा लाईट इन्फंट्री, कोब्रा ट्रेनिंग स्कूल यासह अनेक नामांकित कॉलेज व हॉस्पिटल असल्याने बेळगाव-दिल्ली या विमानफेरीला प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे पथसंचलन केले जाते. यावेळी एअर शो देखील होतो. सध्या दिल्ली येथे एअर शो त्याचबरोबर इतर कवायती सुरू असल्याने विमानांच्या उ•ाणाला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे 26 जानेवारीपर्यंत विमानफेरी बंद ठेवण्याचा निर्णय इंडिगो एअरलाईन्सने घेतला आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना गोवा येथून दिल्लीचा प्रवास करावा लागत आहे.
प्रवाशांनी सहकार्य करावे
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन व एअर शो असल्याने पुढील काही दिवस बेळगाव-दिल्ली विमानफेरी बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.
– त्यागराजन (विमानतळ संचालक)
Home महत्वाची बातमी बेळगाव-दिल्ली विमानफेरी काही दिवस रद्द
बेळगाव-दिल्ली विमानफेरी काही दिवस रद्द
प्रजासत्ताक दिन कवायतींमुळे इंडिगो एअरलाईन्सचा निर्णय : प्रवाशांमधून नाराजी बेळगाव : बेळगाव-दिल्ली विमानफेरी पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय इंडिगो एअरलाईन्सने घेतला आहे. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम असल्याने इंडिगोने 19 ते 26 जानेवारी दरम्यान विमानफेरी रद्द केली आहे. परंतु, यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव-दिल्ली विमानफेरीमुळे केवळ बेळगावच नाही तर सांगली, […]