बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या कामाला मिळाला मुहूर्त

कणकुंबी येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते आज पूजन : रणकुंडये ते चोर्लापर्यंत रस्त्याचे होणार डांबरीकरण बेळगाव : बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला शनिवार दि. 24 पासून प्रारंभ होणार आहे. दुपारी 12 वाजता कणकुंबी गावानजीकच्या शासकीय विश्रामगृहानजीक जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते चालना देण्यात येणार आहे. यामुळे बेळगाव ते चोर्लापर्यंत रस्त्याच्या […]

बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या कामाला मिळाला मुहूर्त

कणकुंबी येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते आज पूजन : रणकुंडये ते चोर्लापर्यंत रस्त्याचे होणार डांबरीकरण
बेळगाव : बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला शनिवार दि. 24 पासून प्रारंभ होणार आहे. दुपारी 12 वाजता कणकुंबी गावानजीकच्या शासकीय विश्रामगृहानजीक जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते चालना देण्यात येणार आहे. यामुळे बेळगाव ते चोर्लापर्यंत रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. बेळगाव तालुक्यातील रणकुंडये क्रॉसपासून गोवा राज्याच्या सीमेपर्यंत रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. यासाठी 58.9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एम. बी. कल्लूर कंपनीला डांबरीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. सध्या असणाऱ्या रस्त्याइतकेच रुंदीचे डांबरीकरण केले जाणार आहे. या कामाला आता शुभारंभ होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगावपासून गोवा राज्याच्या सीमेपर्यंत चोर्ला घाटातील रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी पडलेल्या ख•dयांमुळे रोज अपघात होत आहेत. यामुळे  वाहतूक कोंडीही होत होती. कणकुंबीपासून गोवा राज्याच्या हद्दीपर्यंत रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत होती. या रस्त्याच्या कामाबाबत भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून रस्ता न झाल्याने विकास खोळंबल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच सिटीझन कौन्सिल व बेळगाव ट्रेडर्स फोरमने सुद्धा याबाबत निवेदन दिले होते. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगावला भेट दिली. त्यामुळे बेळगाव-चोर्ला मार्गाच्या कामाला गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात या मार्गाचे रुंदीकरण होणार असल्याने तूर्तास आहे तो रस्ता ख•sमुक्त करून देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
 एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कंत्राट
राष्ट्रीय महामार्ग 448 ए.ए. हा रस्ता बेळगाव विभागांतर्गत येत असून राष्ट्रीय महामार्ग विभाग कारवार यांच्यावतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर रस्त्याचे कंत्राट हुबळी येथील मे. एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी घेतलेले असून रस्त्यासाठी अंदाजे 58 कोटी रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार 35 कोटी रुपयांचे टेंडर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. सदर रस्त्याच्या कामाचे पूजन मंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे.
43 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण
या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात कणकुंबी भागातून अनेकवेळा निवेदन देऊन व आंदोलन करूनही दुर्लक्ष केले होते. अखेर बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यापैकी 26.130 कि.मी. ते 69.480 कि.मी म्हणजेच रणकुंडये ते चोर्ला असे 43 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाला जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरण-वनखात्यामुळे चोर्ला रस्त्याचे दुपदरीकरण रद्द
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चोर्ला रस्त्यावरील ताण ओळखून रस्त्याचे दुपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 279 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु वनखाते व पर्यावरणप्रेमींनी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आडकाठी घातल्याने सदर काम थांबले. राष्ट्रीय महामार्ग कारवार विभागांतर्गत बेळगाव विभागीय राष्ट्रीय महामार्गाच्या सीपीसी मोडवर चोर्ला रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. आजपासून चोर्ला रस्त्याला चालना मिळणार असून या रस्त्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होते. गोव्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांपैकी चोर्ला रस्ता हा मुख्य समजला जातो. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाल्याने ख•dयांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत.