बेळवट्टी ग्रा. पं. भ्रष्टाचाराची समाजकल्याण खात्याकडून चौकशी

अधिकाऱ्यांकडून ग्राम पंचायतमधील कागदपत्रांची कसून तपासणी : तव्र्रारींची घेतली दखल वार्ताहर /किणये बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये विविध कामांमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विविध प्रकारची कामे राबविण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र कामे झालीच नाहीत. ग्रामपंचायत पीडीओ व सदस्यांनी या पंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दलित बांधव व नागरिकांनी केला. […]

बेळवट्टी ग्रा. पं. भ्रष्टाचाराची समाजकल्याण खात्याकडून चौकशी

अधिकाऱ्यांकडून ग्राम पंचायतमधील कागदपत्रांची कसून तपासणी : तव्र्रारींची घेतली दखल
वार्ताहर /किणये
बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये विविध कामांमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विविध प्रकारची कामे राबविण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र कामे झालीच नाहीत. ग्रामपंचायत पीडीओ व सदस्यांनी या पंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दलित बांधव व नागरिकांनी केला. या भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून काढण्यात आला होता. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी तालुका पंचायत समाजकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतमधील कागदपत्रांची कसून चौकशी केली आहे. बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दलित बांधवांनी केला होता. 50 रुपयाच्या संगणक उताऱ्यासाठी 15000 रुपये सर्वसामान्य नागरिकांकडून घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एससी एसटी फंड पूर्णपणे हडप करण्यात आला आहे, अशी तक्रारही केली आहे.
विद्यार्थ्यांना संगणकासाठी अॅडमिशन म्हणून दाखविण्यात आले आहे. तसेच संगणक शिकवणी करण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखवून पैसे काढण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र पंचायत कार्यक्षेत्रातील एकाही विद्यार्थ्याला याचा लाभ मिळालेला नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली. शौचालय कामकाजाच्या नावाखालीही निधी लाटला आहे. याचबरोबर पाणी समस्या निवारण्यासाठी म्हणून योजना राबविण्यात आली. यासाठी सुमारे 60 लाख रुपये इतका निधी खर्च केलेला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी समस्येसाठी काम झाले नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला. दलित संघटनेचे महेश कोलकार, मारुती उर्फ मुन्ना कांबळे, अरुण कांबळे, विलास कांबळे नारायण नलावडे, एन. के. नलवडे, डॉ. अर्जुन पाटील, सुरेश नाईक, नारायण कांबळे, मधुकर देसाई, चेतन पाटील, विनोद कांबळे आदींसह बेळवट्टी, बाकनुर, इनाम बडस, धामणे एस. गावातील नागरिक व महिलांनी बेळवट्टी ग्रामपंचायतवर मोर्चा काढून सदर भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
कामांच्या ठिकाणी जाऊन केली पाहणी
शुक्रवारी समाज कल्याण खात्याचे अधिकारी महांतेश चिमटगुंडी, अजित कंग्राळकर आदीनी ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रांची कसून तपासणी केली आहे. तसेच चौकशीही करण्यात आली आहे  ज्या ज्या ठिकाणी कामकाज केल्याचे दाखवण्यात आले आहे त्या ठिकाणीही जाऊन सदर अधिकाऱ्यांनी पाहणी केली असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली. तसेच ज्या पिडिओंच्या कालावधीत भ्रष्टाचार झाला आहे त्या पिडीओंची बदली झाली आहे. व त्या ठिकाणी अन्य पीडीओ रुजू झाले आहेत. यामुळेही या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या भ्रष्टाचारासंदर्भात चर्चा अधिक रंगली आहे.