बेकवाड लक्ष्मी यात्रेपूर्वी समस्या मार्गी लावणार
खानापूर तालुका प्रशासन-ग्रा. पं.-विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक
वार्ताहर /नंदगड
बेकवाड येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा 28 फेब्रुवारी 2024 पासून 9 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. 15 वर्षानंतर यात्रा होत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यात्रेपूर्वी पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व अन्य समस्या मार्गी लावण्याचा निर्णय बेकवाड येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या सभागृहात बैठकीत घेण्यात आला. खानापूर तालुका प्रशासन, तालुका पंचायत, विविध खात्यांचे अधिकारी, बेकवाड ग्रा. पं. यात्रा उत्सव कमिटी तसेच ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. कार्य. अधिकारी विरनगौडा एगनगौडर, हेस्कॉम अधिकारी कल्पना तिरवीर, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रमेश हेगडे, सार्व. बांधकाम खाते, अरण्य, शिक्षण व पशुखात्याचे अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर ग्रा. पं. अध्यक्षा मोहिनी यळ्ळूरकर, गाव कमिटीचे अध्यक्ष जनकाप्पा पाटील, सचिव शिवराम पाटील, ग्रा.पं.उपाध्यक्षा शबाना मुजावर, सदस्य रुक्माणा झुंजवाडकर, यल्लाप्पा गुरव, परशराम मडवाळकर, नामदेव कोलेकर, गुणवंती तळवार, ज्योती गुरव, संजय कोलकार आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते. स्वागत पीडीओ नागाप्पा बन्ने यांनी केले.
बेकवाड गावाला लक्ष्मी यात्रेनिमित्त रोहयोअंतर्गत गावातील रस्ते व गटार बांधकामासाठी 26 लाख 60 हजाराचे अनुदान मंजूर झाले आहे. अतिरिक्त आराखड्यानुसार आवश्यक ठिकाणी रस्ते, गटारी व पेव्हर्स घालण्यासाठी 58 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. याद्वारे गावातील विकासकामे करण्यात येणार आहेत. बेकवाड क्रॉसपासून स्थळ देवापर्यंत तसेच हायस्कूलपासून लक्ष्मीदेवी यात्रा स्थळापर्यंत पक्का रस्ता बनवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावापर्यंत विद्युतखांब बसवावेत, असाही प्रस्ताव ग्रामस्थांतर्फे ठेवण्यात आला. आमदार फंडातून बेकवाडच्या विकासासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. शाळेत पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची व शिक्षकांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचनाही आमदार हलगेकर यांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. यात्राकाळात 100 के.व्ही. ट्रान्स्फॉर्मरची सोय करावी, 24 तास वीजपुरवठा, पाण्याची सोय, आरोग्य खात्याकडून औषधांसह 24 तास आरोग्य कर्मचारी हजर रहावेत, अशा अनेक सूचना आमदार हलगेकर यांनी अधिकाऱ्यांना केली
Home महत्वाची बातमी बेकवाड लक्ष्मी यात्रेपूर्वी समस्या मार्गी लावणार
बेकवाड लक्ष्मी यात्रेपूर्वी समस्या मार्गी लावणार
खानापूर तालुका प्रशासन-ग्रा. पं.-विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक वार्ताहर /नंदगड बेकवाड येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा 28 फेब्रुवारी 2024 पासून 9 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. 15 वर्षानंतर यात्रा होत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यात्रेपूर्वी पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व अन्य समस्या मार्गी लावण्याचा निर्णय बेकवाड येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या सभागृहात बैठकीत […]