Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार

त्वचेकरिता आपण जेवढे नैसर्गिक वस्तूंचा वापर करू तेवढेच ते आरोग्यसाठी चांगले असते बाजारातील प्रोडक्ट्मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते जे आपल्या त्वचेवर वाईट परिणाम करतात. ब्युटी प्रोडक्ट्मध्ये चॉकलेटचा उपयोग खूप वर्षांपासून करण्यात येतो. आपण सर्व …

Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार

त्वचेकरिता आपण जेवढे नैसर्गिक वस्तूंचा वापर करू तेवढेच ते आरोग्यसाठी चांगले असते बाजारातील प्रोडक्ट्मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते जे आपल्या त्वचेवर वाईट परिणाम करतात. ब्युटी प्रोडक्ट्मध्ये चॉकलेटचा उपयोग खूप वर्षांपासून करण्यात येतो. आपण सर्व जाणतो की, डार्क चॉकलेट आरोग्यसाठी चांगली असते. यामध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट त्वचेसाठी फायदेशीर असते. तुम्ही घरी कोको पावडरचा उपयोग कॉफी, चॉकलेट व्यतिरिक्त चेहऱ्यावर लावण्यासाठी देखील करू शकतात. 

 

दूध-कोको पावडर फेसपॅक- 

कोको पावडरचा फेसपॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये कच्चे दूध घ्यावे. यामध्ये व्हिटॅमिन E कॅप्सूल मिक्स करावी. मग हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. 

 

दही, बेसन फेसपॅक- 

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी एका बाऊलमध्ये दही, बेसन, हळद, कोको पावडर घ्यावी हे चांगल्या प्रकारे मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग दार होण्यास मदत होते. 

 

फ्रुट फेसपॅक- 

फ्रुट्स सोबत कोको पावडरचा उपयोग चांगला मानला जातो. एक पिकलेले केळे घेऊन त्यामध्ये कोको पावडर मिक्स करावी. व नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. उन्हाळ्यामध्ये पाण्यात कोकोपावडर टाकून त्याचा आईसक्युब्स बनवून फेस मसाज करू शकतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

 

Edited By- Dhanashri Naik