आधी लॅपटॉप फोडला…मग जनतेने फोडले
पश्चिम भागात दोघा अधिकाऱ्यांना जनतेकडून धडा
बेळगाव : बेळगाव पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. यासंबंधी पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या घटनेची कुठेच नोंद झाली नाही. जमावाकडून मार खाऊन पळून येणारे दोघे अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या आठवड्यात बेळगाव पश्चिम भागातील एका गावात ही घटना घडली आहे. रविवार 19 मे रोजी रात्री मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा लॅपटॉप फोडल्यामुळे संतप्त जमावाने एक पोलीस निरीक्षक व एक उपनिरीक्षक यांची धुलाई केली आहे. सुरळीतपणे सुरू असलेली मिरवणूक अडवून काठीने लॅपटॉप फोडल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून अधिकारी बेळगावला आले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बेळगाव येथे सेवा बजावणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी बेळगावला आलेल्या अधिकाऱ्यांपैकी अनेक जणांची वागणूक लक्षात घेता जत्रेला आल्यासारखेच त्यांचे वागणे आहे. कसेही निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही आमच्या मूळ जिल्ह्यात जाणार आहोत. त्यामुळे आहे तितके दिवस कसेबसे काढून निघण्याच्या बेतात ते आहेत. त्यामुळेच बेळगाव शहर व तालुक्यात मटका, जुगार, बेकायदा दारू व्यवसाय फोफावला आहे. जाता जाता जे मिळेल ते ओरबाडून घेऊया, या मन:स्थितीतील अधिकाऱ्यांमुळे गैरधंदे खुलेआम सुरू आहेत. त्याचाच फटका आठ दिवसांपूर्वी दोन अधिकाऱ्यांना बसल्याची माहिती मिळाली आहे.
Home महत्वाची बातमी आधी लॅपटॉप फोडला…मग जनतेने फोडले
आधी लॅपटॉप फोडला…मग जनतेने फोडले
पश्चिम भागात दोघा अधिकाऱ्यांना जनतेकडून धडा बेळगाव : बेळगाव पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. यासंबंधी पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या घटनेची कुठेच नोंद झाली नाही. जमावाकडून मार खाऊन पळून येणारे दोघे अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या आठवड्यात बेळगाव […]