सांतईनेज रस्त्यावर सावधगिरी बाळगावी
स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे आवाहन : दोन महिन्यात काम होणार पूर्ण
पणजी : सांतईनेज भागातील रस्त्यांच्या दुऊस्तीचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असून हे काम पुढील दोन महिने चालू राहणार आहे. याठिकाणी मोरी बांधणे तसेच मलनिस्सारणसाठी साधरणत: 1 मीटर खोल विहिरींचे बांधकामही चालू असल्याने नागरिकांनी या रस्त्यावऊन जाताना सावधगिरी बाळगावी असे स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी कळविले आहे. सांतईनेज मुख्य रस्ता ते टोंक येथील मलनिस्सारण प्रकल्पाजवळील पूल इथपर्यंत रस्ता सपाटीकरण व इतर कामे चालू आहेत. या रस्त्यावर चरही खोदलेले आहेत. त्यात मोठ्या वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे माती, पाणी व इतर सामग्रीमुळे चालणे, वाहने चालविणे अशक्य होईल. रस्ता पूर्णत: पूर्वपदावर येण्यासाठी दोन महिने लागतील. रस्ता काही ठिकाणी खचण्याचीही शक्यता असल्याने तसे काही आढळल्यास नागरिकांनी मुकूंद मळीक (8806814440) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही स्मार्टसिटी व्यवस्थापनाने केले आहे.
Home महत्वाची बातमी सांतईनेज रस्त्यावर सावधगिरी बाळगावी
सांतईनेज रस्त्यावर सावधगिरी बाळगावी
स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे आवाहन : दोन महिन्यात काम होणार पूर्ण पणजी : सांतईनेज भागातील रस्त्यांच्या दुऊस्तीचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असून हे काम पुढील दोन महिने चालू राहणार आहे. याठिकाणी मोरी बांधणे तसेच मलनिस्सारणसाठी साधरणत: 1 मीटर खोल विहिरींचे बांधकामही चालू असल्याने नागरिकांनी या रस्त्यावऊन जाताना सावधगिरी बाळगावी असे स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी कळविले आहे. सांतईनेज […]
