मुंबईत लवकरच बॅटरीवर चालणारे मालवाहू जहाज बांधले जाणार

देशाला शाश्वत व हरित ऊर्जा साधनांनी सक्षम करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. देशातील पहिले बॅटरीआधारित मालवाहू जहाज येत्या काळात तयार होणार आहे. तब्बल 3 हजार टन क्षमतेच्या या जहाजाची बांधणी लवकरच सुरू होणार आहे. देशाला हरित जहाज व हरित समुद्री क्षेत्राचे केंद्र करण्यासंबंधी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद अलीकडेच केंद्रीय जहाज बांधणी व बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत मुंबईत (mumbai) झाली. त्यामध्ये बॅटरीआधारित देशातील या पहिल्या मालवाहू जहाजाची घोषणा मुंबई बंदरात (mumbai port) कार्यरत असलेल्या एसएसआर मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून करण्यात आली. ‘कोणतेही मालवाहू जहाज हे एरव्ही 100 टक्के डिझेलवर चालते. यामध्ये डिझेलद्वारे तयार होणारी वीज बॅटरीत साठवली जाणार असल्याने डिझेल व इलेक्ट्रिक, अशी दोन्ही इंधन किंवा ऊर्जा साधने जहाज चालविण्यासाठी उपलब्ध असतील. यामुळे 10 टक्के इंधनाची बचत होऊन तितके कार्बन उत्सर्जन कमी होईल. 2047 पर्यंत ‘विकसित भारता’चे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने हे सागरी क्षेत्रातील पहिले मोठे पाऊल आहे’ असे एसएसआर मरीनचे संजीव अग्रवाल यांनी या परिषदेत बोलताना स्पष्ट केले. डिझेल-इलेक्ट्रिक प्रकारचे जहाज (cargo ship) बांधले जाणार आहे. डिझेलच्या आधारे वीज तयार करून ती वीज बॅटरीमध्ये साठवली जाईल. त्या बॅटरीच्या आधारे जहाज पुढे मार्गक्रमण करेल. अशाप्रकारचे तंत्रज्ञान भारतात (india) सध्या केवळ पाणबुड्यांमध्ये वापरले जाते. ते मालवाहू जहाजात आणले जात आहे. बॅटरीवर आधारित जहाजावर आधारितयाअंतर्गत डिझेल-इलेक्ट्रिक प्रकारचे जहाज बांधले जाणार आहे.डिझेलच्या आधारे वीज तयार करून ती वीज बॅटरीमध्ये साठवली जाईल व त्याच बॅटरीच्या आधारे जहाज पुढे मार्गक्रमण करील.अशा प्रकारचे तंत्रज्ञान भारतात सध्या केवळ पाणबुड्यांमध्ये वापरले जाते. ते प्रथमच मालवाहू जहाजांमध्ये वापरले जाणार आहे.हेही वाचा स्कूल बसेससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार मलबार हिलमधील वॉकवेसाठी प्रवेश शुल्क ?

मुंबईत लवकरच बॅटरीवर चालणारे मालवाहू जहाज बांधले जाणार

देशाला शाश्वत व हरित ऊर्जा साधनांनी सक्षम करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. देशातील पहिले बॅटरीआधारित मालवाहू जहाज येत्या काळात तयार होणार आहे. तब्बल 3 हजार टन क्षमतेच्या या जहाजाची बांधणी लवकरच सुरू होणार आहे.देशाला हरित जहाज व हरित समुद्री क्षेत्राचे केंद्र करण्यासंबंधी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद अलीकडेच केंद्रीय जहाज बांधणी व बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत मुंबईत (mumbai) झाली. त्यामध्ये बॅटरीआधारित देशातील या पहिल्या मालवाहू जहाजाची घोषणा मुंबई बंदरात (mumbai port) कार्यरत असलेल्या एसएसआर मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून करण्यात आली.‘कोणतेही मालवाहू जहाज हे एरव्ही 100 टक्के डिझेलवर चालते. यामध्ये डिझेलद्वारे तयार होणारी वीज बॅटरीत साठवली जाणार असल्याने डिझेल व इलेक्ट्रिक, अशी दोन्ही इंधन किंवा ऊर्जा साधने जहाज चालविण्यासाठी उपलब्ध असतील. यामुळे 10 टक्के इंधनाची बचत होऊन तितके कार्बन उत्सर्जन कमी होईल. 2047 पर्यंत ‘विकसित भारता’चे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने हे सागरी क्षेत्रातील पहिले मोठे पाऊल आहे’ असे एसएसआर मरीनचे संजीव अग्रवाल यांनी या परिषदेत बोलताना स्पष्ट केले.डिझेल-इलेक्ट्रिक प्रकारचे जहाज (cargo ship) बांधले जाणार आहे. डिझेलच्या आधारे वीज तयार करून ती वीज बॅटरीमध्ये साठवली जाईल. त्या बॅटरीच्या आधारे जहाज पुढे मार्गक्रमण करेल. अशाप्रकारचे तंत्रज्ञान भारतात (india) सध्या केवळ पाणबुड्यांमध्ये वापरले जाते. ते मालवाहू जहाजात आणले जात आहे. बॅटरीवर आधारित जहाजावर आधारितयाअंतर्गत डिझेल-इलेक्ट्रिक प्रकारचे जहाज बांधले जाणार आहे.डिझेलच्या आधारे वीज तयार करून ती वीज बॅटरीमध्ये साठवली जाईल व त्याच बॅटरीच्या आधारे जहाज पुढे मार्गक्रमण करील.अशा प्रकारचे तंत्रज्ञान भारतात सध्या केवळ पाणबुड्यांमध्ये वापरले जाते. ते प्रथमच मालवाहू जहाजांमध्ये वापरले जाणार आहे.हेही वाचास्कूल बसेससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणारमलबार हिलमधील वॉकवेसाठी प्रवेश शुल्क ?

Go to Source