बस्तवाडची लक्ष्मी ठरतेय कुस्तीत ‘दंगल गर्ल’

वार्ताहर /किणये बस्तवाड (हलगा) गावची कन्या लक्ष्मी संजय पाटील ही कुस्तीमध्ये दंगल गर्ल ठरू लागली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत तिने विविध पारितोषिके मिळविली आहेत. नुकत्याच 26 ते 29 डिसेंबर या कालावधीत उत्तर प्रदेशमधील नंदिनीनगर गोंडा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील महिला कुस्ती स्पर्धेत तिने ब्रांझपदक पटकाविले आहे. तिच्या या […]

बस्तवाडची लक्ष्मी ठरतेय कुस्तीत ‘दंगल गर्ल’

वार्ताहर /किणये
बस्तवाड (हलगा) गावची कन्या लक्ष्मी संजय पाटील ही कुस्तीमध्ये दंगल गर्ल ठरू लागली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत तिने विविध पारितोषिके मिळविली आहेत. नुकत्याच 26 ते 29 डिसेंबर या कालावधीत उत्तर प्रदेशमधील नंदिनीनगर गोंडा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील महिला कुस्ती स्पर्धेत तिने ब्रांझपदक पटकाविले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावरच बस्तवाडची लक्ष्मी पाटील हिने कुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आपण कुस्तीमध्ये भाग घेऊन आपल्या आई-वडिलांचे तसेच गावचे नाव उज्ज्वल करणार, असा तिने ध्येय बाळगले आहे. त्यामुळेच ती अनेक ठिकाणी झालेल्या कुस्तीमध्ये यश मिळवताना दिसत आहे. उत्तर प्रदेश येथे झालेल्या महिलांच्या 57 किलो वजन गटांमध्ये तिने ब्रांझपदक पटकाविले आहे.
राज्य स्पर्धेत 18 तर राष्ट्रीय स्पर्धेत 6 पदके
या स्पर्धेत देशातील एकूण 19 मुलींनी सहभाग घेतला होता. लक्ष्मी सध्या हल्याळ येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये सराव करत असून ती छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिकत आहे. तिला कुस्तीसाठी तुकाराम गावडा हे मार्गदर्शन करत आहेत. वडील संजय पाटील यांच्याकडूनही तिला स्पर्धेसाठी प्रेरणा मिळाली आहे. याचबरोबर दिल्ली येथे झालेल्या 57 किलो वजन गटांमध्ये तिने रौप्य पदक पटकाविले आहे. दसरा किशोरी कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच सीएम कप स्पर्धेत 59 किलो वजन गटांमध्ये बक्षीस मिळविले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 18 पदके व राष्ट्रीय पातळीवरील सहा पदके तिने मिळविली आहेत. बस्तवाडच्या या कन्येने कुस्तीत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून यापुढेही ती कुस्तीचा सराव करत तिने बस्तवाड गावचे नाव उंचावले आहे.