बसवण कुडची यात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

सोमवारी रुद्राभिषेक : आंबील गाड्यांची मिरवणूक वार्ताहर /सांबरा बसवण कुडची येथे शनिवार दि. 30 मार्चपासून  ग्रामदैवत श्री बसवेश्वर, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेवाच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. दि. 30 रोजी पहाटे इंग्ळ्यांची लाकडे आणण्यासाठी ग्रामस्थ बैलगाड्या घेऊन डोंगराकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी लाकडे घेऊन गावात परतणार आहेत. सोमवार दि. 1 रोजी सकाळी मंदिरात रुद्राभिषेक घालण्याचा […]

बसवण कुडची यात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

सोमवारी रुद्राभिषेक : आंबील गाड्यांची मिरवणूक
वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथे शनिवार दि. 30 मार्चपासून  ग्रामदैवत श्री बसवेश्वर, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेवाच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. दि. 30 रोजी पहाटे इंग्ळ्यांची लाकडे आणण्यासाठी ग्रामस्थ बैलगाड्या घेऊन डोंगराकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी लाकडे घेऊन गावात परतणार आहेत. सोमवार दि. 1 रोजी सकाळी मंदिरात रुद्राभिषेक घालण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता आंबील गाड्यांची मंदिरला प्रदक्षिणा घालण्यात येईल. यावेळी आंबील व घुगऱ्या वाटण्यात येतील. त्यानंतर गाडे पळविण्यात येतील. रात्री दहा वाजता शाहीर गाणे व पूजा कार्यक्रम होईल. .मंगळवार दि. 2 रोजी सकाळी धार्मिक पूजा, सायंकाळी पाच वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम, रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व भजनाचा कार्यक्रम होईल. बुधवार दि. 3 व गुरुवार दि. 4 रोजी गावामध्ये खळ्याच्या कुस्त्यांचे आयोजन केले आहे. मंगळवार दि. 9 रोजी गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात अभिषेक घालण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता पंचांग पठण व त्यानंतर बाल शिवाजी लाठी मेळ्यातर्फे प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होऊन यात्रा महोत्सवाची सांगता होईल. तरी नागरिकांनी यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे यात्रा कमिटीने कळविले आहे.